इराण-अमेरिका युद्धात इराणनं अमेरिकेचं विमान पाडल्यानंतर त्यातल्या वैमानिकाला अमेरिकन सैन्यानं थेट इराणच्या हद्दीत शिरून हुडकून काढलं आणि पहाडांमध्ये लपून बसलेल्या आपल्या या शूर वैमानिकाला वाचवलं.. ही बातमी एव्हाना जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. पण, एवढी धाडसी मोहीम अमेरिकेनं कशी फत्ते केली? आपल्या या वैमानिकाला त्यांनी नेमकं कसं वाचवलं?
या बचावाच्या थराराची कहाणी आता व्हायरल झाली आहे. ही मोहीम खरोखरच अवघड होती. आपल्या एका जवानाला वाचवण्यासाठी अमेरिकेनं अक्षरश: लक्षावधी डॉलर्स तर खर्च केलेच; पण अति दुर्गम पहाडात लपून बसलेल्या या जवानाला वाचवण्यासाठी त्यांनी जे तंत्रज्ञान वापरलं, ते खरोखरच आपल्या हृदयाची धडधड वाढवणारं आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या या सैनिकाला वाचवण्यासाठी नेमक्या याच धडधडीचा त्यांनी वापर केला. आपल्या एअरमनच्या हृदयाची धडधड थेट ४० मैल (सुमारे ६४ किलोमीटर) दूर अंतरावरून त्यांनी ऐकली, तो आपलाच जवान आहे, हे ओळखलं आणि मग त्याला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली!
पण, हे नेमकं घडलं तरी कसं? - अमेरिकेची प्रमुख गुप्तचर संस्था ‘सीआयए’नं त्यासाठी अशा एका तंत्रज्ञानाचा वापर केला, ज्यामुळे सगळ्या जगानं आश्चर्यानं तोंडात बोटं घातली. त्या उपकरणाचं नाव आहे, ‘घोस्ट मर्मर’! या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य म्हणजे कित्येक किलोमीटर अंतरावरून एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या हृदयाची धडधड हे उपकरण ओळखू शकतं. त्यामुळेच हा एअरमन कुठे लपला आहे, तो कुठे आहे, हे कोणालाच माहीत नसताना, खुद्द इराणचे हजारो सैनिक आपल्याच भूमीत या जवानाचा शोध घेत असताना, त्यांना त्याचा पत्ता लागला नाही; मात्र, कित्येक किलोमीटर अंतरावरून अमेरिकेच्या तंत्रज्ञांनी आणि सैनिकांनी या जवानाच्या हृदयाची धडधड ऐकली, ते त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी त्याला वाचवलं!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याच शब्दांत सांगायचं तर, अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध आणि बचाव मोहिमांपैकी एक म्हणून या घटनेची नोंद झाली आहे!
न्यू यॉर्क पोस्ट आणि अमेरिकन न्यूज साइटच्या अहवालानुसार, हे तंत्रज्ञान लांब पल्ल्याच्या क्वान्टम मॅग्नेटोमेट्रीचा वापर करून माणसाच्या हृदयाच्या धडधडीच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक चिन्हांचा शोध घेतं आणि हा डेटा एआय सॉफ्टवेअरला जोडून आसपासच्या अनेक आवाजांतून त्या विशिष्ट चिन्हाला वेगळं करतं. सोप्या भाषेत सांगायचं तर, ‘घोस्ट मर्मर’ अशा अतिशय सूक्ष्म इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्सचा शोध घेतं, जे माणसाच्या हृदयाच्या धडधडीतून दूरवर पसरतात.
समजा एखाद्या भव्य स्टेडियममध्ये एखादी मॅच सुरू आहे. मॅच पाहण्यासाठी हजारो चाहते जमले आहेत. मॅच अतिशय रंगात आली आहे. प्रेक्षकही जल्लोष करताहेत; पण, या कोलाहलातील हजारो आवाजांमधून नेमका आवाज आणि नेमकी व्यक्ती शोधून काढण्यासारखंच हे आहे. तज्ञांचं म्हणणं आहे, तुमचं हृदय जर धडधडत असेल, तर जगाच्या पाठीवर कुठूनही आम्ही तुम्हाला शोधून काढू!
या मोहिमेनंतर पत्रकार परिषदेत सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी सांगितलं, अमेरिकेचा एक शूर सैनिक जिवंत आहे आणि पर्वतातील एका कपारीत लपलेला आहे हे आम्ही आधी शोधून काढलं! तो शत्रूच्या नजरेपासून दूर होता; पण, ‘सीआयए’च्या दृष्टीपासून नाही!..
Web Summary : America rescued a pilot in Iran using 'Ghost Murmur' technology. This tech detects heartbeats from 40 miles away, enabling the daring rescue. CIA used it to locate the hidden pilot, a historic mission hailed by Trump.
Web Summary : अमेरिका ने 'घोस्ट मर्मर' तकनीक से ईरान में एक पायलट को बचाया। यह तकनीक 64 किमी दूर से दिल की धड़कन का पता लगाती है। CIA ने छिपे हुए पायलट का पता लगाया, जिसे ट्रम्प ने ऐतिहासिक मिशन कहा।