शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीही मंदीच्या विळख्यात; जगभरात उमटणार पडसाद, जीडीपीमध्ये सलग दुसऱ्या तिमाहीत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 06:30 IST

जर्मनीच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ च्या पहिल्या तिमाहीत जर्मनीचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ०.३ टक्क्यांनी घसरले आहे.

बर्लिन : युरोपातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनी मंदीत ढकलला गेला आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत सलग दुसऱ्या तिमाहीत ०.३ टक्के घट झाली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या आर्थिक आकडेवारीतून ही माहिती समोर आल्यानंतर जर्मनीतील मंदीवर शिक्कामोर्तब झाले आहे. जर्मनीची अर्थव्यवस्था ही युरोपमधील सर्वात मोठी आणि जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे तेथील मंदीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जर्मनीतील मंदी जगाच्या चिंतेचे कारण बनली आहे. 

जर्मनीच्या सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ च्या पहिल्या तिमाहीत जर्मनीचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ०.३ टक्क्यांनी घसरले आहे. त्याआधी २०२२च्या शेवटच्या तिमाहीत जर्मनीचा जीडीपी ०.५ टक्क्यांनी घसरला होता. जानेवारी महिन्यात जर्मनीच्या जीडीपीमध्ये ०.४ टक्के वाढीचा अंदाज हाेता. मात्र, या अंदाजावर फेरविचार करावा लागणार आहे. यापूर्वी कोरोनामुळे २०२० मध्ये जर्मनीमध्ये मंदी आली होती. (वृत्तसंस्था)

महागाईने कंबरडे मोडलेजर्मनीत महागाईने कळस गाठल्यामुळे लोकांनी खर्चात कपातीचे धोरण स्वीकारले आहे. खाद्यान्न महागाईचा दर १६%पेक्षा जास्त आहे. तर एकूण महागाई ७%पेक्षा जास्त आहे. त्यामुळे पारिवारिक वस्तू वापर (हाउसहोल्ड कंझम्प्शन) १.२ टक्के घटला आहे. याचा परिणाम म्हणून औद्योगिक उत्पादनात मोठी घट झाली आहे. 

रशिया-युक्रेन युद्धाचा फटकाn युक्रेन-रशिया युद्ध हे जर्मनीतील मंदीचे मुख्य कारण आहे. या युद्धामुळे रशियातून होणारा गॅसपुरवठा थांबल्यामुळे जर्मनीला मोठा फटका बसला आहे. n जर्मनी गॅसपुरवठ्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात रशियावर अवलंबून आहे. गॅसपुरवठा थांबल्यामुळे जर्मनीतील औद्योगिक उत्पादन ठप्प झाले आहे. त्यातून निर्यात घटली. जर्मनीची अर्थव्यवस्था निर्यातीवरच अवलंबून असल्यामुळे अंतिमत: मंदीचा शिरकाव झाला.

कशी ठरते मंदी?सलग दोन तिमाहीत अर्थव्यवस्थेत नकारात्मक वाढ नाेंदविल्यास मंदीचा शिरकाव झाल्याचे मानले जाते. मंदी निश्चित करण्याचा हा आंतरराष्ट्रीय मानक आहे. जर्मनीत सलग दोन तिमाहीत अर्थव्यवस्था वाढत घट झाल्यामुळे मंदीवर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झाले आहे.तज्ज्ञ काय म्हणतात?आयएनजी बँकेचे मॅक्रो हेड कर्स्टन ब्रेझस्की यांनी सांगितले की, सौम्य हिवाळी हवामान आणि कोविडनंतर पुरवठा साखळीत सुधारणा होण्याच्या मार्गातील अडथळे यामुळे जर्मनीची अर्थव्यवस्था मंदीच्या बाहेर राहण्यात अपयशी ठरली आहे.याआधी केव्हा आली होती मंदी?याआधी कोरोना साथीच्या काळात २०२० च्या सुरुवातीला जर्मनीत मंदी आली होती. व्यापक प्रमाणावरील लॉकडाऊनमुळे तेव्हा जर्मनीच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला होता.

मंदीच्या शक्यतेचा  अंदाज...    भारत    ०%    इंडाेनेशिया    २%    साैदी अरब    ५%    चीन    १२.५%    ब्राझिल    १५%    स्पेन    २५%    मेक्सिकाे    २७.५%    द. काेरिया    ३०%    जपान    ३५%    रशिया    ३७.५%    ऑस्ट्रेलिया    ४०%    फ्रान्स    ५०%    कॅनडा    ६०%    इटली    ६०%    जर्मनी    ६०%    अमेरिका    ६५%    न्यूझीलंड    ७०%    ब्रिटन    ७५%

टॅग्स :Germanyजर्मनी