शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऑडी कारमधील 'मेकॅनिकल लोच्या' उघड; कंपनीच्या सीईओला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 16:44 IST

काही महिन्यांपूर्वी ऑडीच्या गाड्यांमधील उत्सर्जन नियंत्रण यंत्रणेत फेरफार करण्यात आल्याची बाब समोर आली होती.

बर्लिन: डिझेल गाडीच्या इंजिनात बेकायदेशीर बदल करून पर्यावरणाला हानी पोहोचवल्याचा आरोप असणारे फोक्सवॅगनच्या ऑडी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रुपर्ट स्टॅडलर यांना सोमवारी जर्मनीत अटक करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी ऑडीच्या गाड्यांमधील उत्सर्जन नियंत्रण यंत्रणेत फेरफार करण्यात आल्याची बाब समोर आली होती. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्टॅडलर यांना ताब्यात घेण्यात आल्याचे जर्मन तपासयंत्रणांनी स्पष्ट केले. 

 

काय आहे प्रकरण?साधारण तीन वर्षांपूर्वी 'डिझेलगेट' नावाचा हा घोटाळा उघडकीस आला होता. VW मॉडेलच्या गाड्यांमध्ये कंपनीने विशिष्ट उपकरण लावले होते. मोटारीतून निघणाऱ्या प्रदूषणकारी वायूंची मोजदाद होऊ नये यासाठी चलाखी केली होती. या कंपनीने असे सॉफ्टवेअर विकसित केले की मोटारीस प्रदूषण मोजमाप सुरू झाल्याचे कळत असे. या काळात मोटारीच्या इंजिनातून कोणतेही अतिरिक्त उत्सर्जन होत नसे. हे मोजमाप बंद झाल्यावर मात्र फोक्सवॅगनच्या मोटारीतून पुन्हा मोठ्या प्रमाणात उत्सर्जनला सुरुवात होत असे. अमेरिकी सरकारच्या पर्यावरणरक्षण विभागातील डॅनियल कार्डर या अभियंत्याने ही चलाखी उघड केली. त्याने या कंपनीच्या मोटारी पर्यावरणरक्षणाचे नियम पाळत नसल्याचे सप्रमाण सिद्ध केले. १५ ते ३५ पट जास्त विषारी वायूकार्डर व त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी फोक्सवॅगनच्या मोटारींचाच नव्हे तर इतर कंपन्यांच्या मोटारींचाही अभ्यास केला होता. त्यामध्ये फोक्सवॅगनच्या गाडय़ांमध्ये काहीतरी गडबड लक्षात आली. लॉस एंजालिस, वेस्ट कोस्ट ते सियाटल अशा अनेक ठिकाणी या वाहनांच्या चाचण्या झाल्या. त्यात या गाडय़ा १५ ते ३५ पट जास्त कार्बन व इतर वायू बाहेर टाकीत असल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Volkswagonफोक्सवॅगनAudiआॅडीenvironmentवातावरण