शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

फ्रान्सच्या राष्ट्रपतींना पत्नीनं सर्वांसमोर मारली थापड? तोंड लपवू लागले इमॅन्युएल मॅक्रॉन, बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 17:50 IST

येथे मॅक्रॉन पत्नी ब्रिजिट मॅक्रॉनसह राजकीय दौऱ्यावर आहेत. या घटनेनंतर, इमॅन्युएल मॅक्रॉन आपला चेहरा लपवतानाही दिसत आहेत.

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मॅक्रॉन यांची पत्नी त्यांना थापड मारताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे फ्रान्सचे राष्ट्रपती भवन द एलिसी पॅलेसमध्ये खळबळ उडाली आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा हा व्हिडिओ व्हिएतनामची राजधानी हनोईचा आहे. येथे मॅक्रॉन पत्नी ब्रिजिट मॅक्रॉनसह राजकीय दौऱ्यावर आहेत. या घटनेनंतर, इमॅन्युएल मॅक्रॉन आपला चेहरा लपवतानाही दिसत आहेत.

हा व्हिडिओ रविवारचा (२५ मे २०२५) असल्याचे बोलले जात आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे फर्स्ट लेडीसह हनोईमध्ये पोहोचताच विमानाचा दरवाजा उघडतो, याच वेळी ब्रिजिट मॅक्रॉन राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्या चेहऱ्यावर मारताना आणि ढकलताना दिसत आहेत. याच वेळी, इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या लक्षात येते की, कॅमेरामन आणि मीडिया बाहेर उभा आहे. तेव्हा ते थोडे गडबडतात. मात्र, लगेचच स्वतःला सावरत हसून माध्यमांकडे हात हलवतात आणि नंतर विमानात जातात. यानंतर, ते विमानातून खाली उतरले. मात्र, एकमेकांचा हात धरून खाली उतरले नाही. महत्वाचे म्हणजे, त्यावेळी इमॅनुअल मॅक्रॉन थोडे अस्वस्थही वाटत होते. 

फ्रेंच राष्ट्रपती राजवाडा एलिसी पॅलेसने सुरुवातीला विमानात असे काही घडले असल्याचे नाकारले होते. मात्र नंतर, हे जोडप्यातील किरकोळ भांडण होते. एलिसी हाऊसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन एकमेकांची थट्टा करत होते आणि त्यांची छेड काढत होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या एका जवळच्या मित्राने याला पती-पत्नीमधील सर्वसाधारण भांडण असे म्हटले आहे.

खरे तर, इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिजिट मॅक्रॉन यांची प्रेम कहाणी प्रसिद्ध आहे. दोघांमध्ये २४ वर्षांचे अंतर आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन १५ वर्षांचे असताना ३९ वर्षीय ब्रिजिट यांच्या प्रेमात पडले होते. ब्रिजिट आधीच विवाहित होत्या आणि त्यांना तीन मुलेही होती. ब्रिजिट मॅक्रॉन यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्या एका कॅथोलिक शाळेत शिक्षिका होती आणि इमॅन्युएल त्यांचा विद्यार्थी होता. ब्रिजिट यांनी पहिल्या पतीला घटस्फोट दिला आणि दोघांनीही २००६ मध्ये लग्न केले. त्यावेळी इमॅन्युएल मॅक्रॉन २९ वर्षांचे होते.

टॅग्स :Franceफ्रान्स