शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्राध्यक्षांनी मेकअपवर खर्च केले 3 महिन्यात 20 लाख रूपये, होतोय टीकेचा भडीमार

By सागर सिरसाट | Updated: August 29, 2017 01:53 IST

आपल्या चेह-याची जरा जास्तच काळजी घेतात असं वाटतं. कारण अध्यक्षपदी निवडून तीनच महिने झालेत आणि त्यांनी आतापर्यंत केवळ मेकअपवर 20 लाख रूपये...

ठळक मुद्देअध्यक्षपदी निवडून केवळ तीनच महिने झालेत आणि त्यांनी आतापर्यंत केवळ मेकअपवर 26,000 यूरो म्हणजे जवळपास 19 लाख 81 हजार 817 रुपये खर्च केले आहेत. एका फ्रेंच मॅगझिनने गुरुवारी याबाबत खुलासा केला.

पॅरिस, दि. 27 - तीन महिन्यांपूर्वी फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इमॅन्युअल माक्रोन यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आणि 39 वर्षीय माक्रोन हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्रपती बनले. पण इमॅन्युअल माक्रोन हे आपल्या चेह-याची जरा जास्तच काळजी घेतात असं वाटतं. कारण अध्यक्षपदी निवडून केवळ तीनच महिने झालेत आणि त्यांनी आतापर्यंत केवळ मेकअपवर 26,000 यूरो म्हणजे जवळपास 19 लाख 81 हजार 817 रुपये खर्च केले आहेत. 

एका फ्रेंच मॅगझिनने गुरुवारी याबाबत खुलासा केला. इमॅन्युअल यांनी आपल्या कार्यकाळातील सुरूवातीच्या 100 दिवसात तब्बल 30 हजार डॉलर आफल्या मेकअपवर खर्च केले आहेत असं या मॅगझिनने म्हटलं. कहर म्हणजे खर्च केलेला हा सर्व पैसा हा करदात्यांचा होता. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. 

इमॅन्युअल यांनी आपल्या खासगी मेकअप आर्टिस्टला दोन वेळेस पेमेंट केलं. यापैकी एका बिलाची किंमत 10 हजार युरो आणि दुस-या बिलाची किंमत 16 हजार युरो इतकी होती. अध्यक्षांच्या कार्यालयानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इमॅन्युअल यांच्या मेकअपवरील खर्चाबाबत आलेले वृत्त खरं आहे असं अध्यक्षांच्या कार्यालयाने म्हटलं आहे.  मात्र हा खर्च कमी करण्यात येईल, असेही कार्यालयाने म्हटले आहे.

ही माहिती समोर आल्यापासून इमॅन्युअल टीकाकारांचं लक्ष्य ठरले आहेत. त्यांच्यावर सोशल मीडियामधून जोरदार टीका होत आहे.  

39 वर्षीय माक्रोन हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सुमारे 80 लाख 50 हजार 245 म्हणजेच एकूण मतदानापैकी 61.3 टक्के मते मिळवली होती.  तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मेरी ले पेन यांना 50 लाख 89 हजार 894 म्हणजे एकूण मतदानाच्या 38.7 टक्केच मते मिळवता आली.  फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशाचे भावी राष्ट्रपती म्हणून माक्रोन यांचे नाव चर्चेत होते. अखेर अपेक्षेप्रमाणे प्रत्यक्ष निवडणुकीतही माक्रोन यांनी बाजी मारली.काय म्हणाले होते विजयानंतर-  माझ्या विजयाने ही फ्रान्सचा समृद्ध इतिहासामधील एका नवा अध्यायाची सुरुवात होत आहे. हा विजय एक आशा आणि विश्वास बनावा, अशी अपेक्षा मॅक्रॉन यांनी विजयानंतर व्यक्त केली होती.  माजी बँकर असलेल्या माक्रोन यांचा जन्म उत्तर फ्रान्समध्ये 21 डिसेंबर 1977 रोजी झाला होता.  माजी बँकर असलेल्या माक्रोन यांना 2012 साली तात्कालीन राष्ट्रपती ओलांद यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तसेच 2014 साली त्यांनी फ्रान्स सरकारमध्ये वित्त मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली होती.  2016 च्या अखेरीस फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे आले होते.