शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

फ्रान्समध्ये देशव्यापी संप दुसऱ्या आठवड्यातही सुरूच राहण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 01:24 IST

पेन्शन सुधारणांना प्रखर विरोध; संपाने देशात रेल्वे, मेट्रोसेवा ठप्प, १९९५ नंतरचे सर्वांत मोठे आंदोलन

पॅरिस : फ्रान्समध्ये पेन्शन सुधारणांना प्रखर विरोध करण्यासाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, हे आंदोलन पुढील आठवड्यातही सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. १९९५ नंतरचा हा सर्वांत मोठा देशव्यापी संप आहे. शनिवारी सप्ताहाच्या अखेरीस झालेल्या या संपाने देशात रेल्वे, मेट्रो सेवा ठप्प झाल्या. हवाई सेवेवर या संपाचा फार कमी परिणाम झाला. गुरुवारी झालेल्या निदर्शनांत तब्बल आठ लाख लोकांनी सहभाग नोंदवला होता.राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन यांच्या पेन्शन सुधारणांच्या प्रस्तावित योजनेला संपामुळे आव्हान मिळाले आहे. देशभरात हजारो लोक रस्त्यांवर उतरून निदर्शने करीत आहेत. त्यामुळे परिवहन सेवा ठप्प झाल्या आहेत.

मागील गुरुवारी संपाला सुरुवात झाली. संपाचा प्रभाव एवढा मोठा होता की, त्याने १९९५ च्या मोठ्या संपाच्या आठवणी ताज्या केल्या. तेव्हा तीन आठवड्यांचा संप करण्यात आला होता व तत्कालीन सरकारला सामाजिक धोरण मागे घ्यावे लागले होते.प्रचंड संख्येने मोर्चे काढणाºया संघटनांनी आता आगामी मंगळवारीही मोठ्या प्रमाणावर देशव्यापी निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.

तथापि, मागील तीन दिवसांपासून ठप्प असलेल्या परिवहन सेवेत थोडीशी सुधारणा होण्याची शक्यता आहे. फ्रान्सच्या विद्यमान सरकारने यापूर्वी यलो वेस्ट आंदोलनाचा सामना केलेला आहे. फ्रान्समध्ये असमानतेच्या विरोधात मागील वर्षी झालेल्या या आंदोलनाने सरकारला हादरवून टाकले होते. फ्रान्समधील ४२ प्रकारच्या पेन्शन योजना हटवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्या विरोधात जनमानस संतप्त झाले आहे. या सुधारणांमध्ये पेन्शन हे नोकरीच्या कालावधीनुसार मिळणार आहे. सध्या ते शेवटच्या पगाराशी निगडित आहे. 

टॅग्स :Franceफ्रान्सInternationalआंतरराष्ट्रीय