युरोपची दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आणि ज्या देशाने भारताला शक्तीशाली राफेल फायटर जेट दिली त्या फ्रान्सचे सरकार कोसळले आहे. दक्षिणपंथी आणि कट्टरपंथी खासदारांनी एकत्र येत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. तो त्यांनी जिंकला आहे. यामुळे पंतप्रधान मिशेल बार्नियर यांना सत्तेतून हटविण्यात आले अ्सून राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोंचे पदही धोक्यात आले आहे.
अर्थसंकल्पातील वादंगानंतर विरोधकांनी बार्नियर सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. हा अविश्वास प्रस्ताव हरल्याने बार्नियर आणि त्यांच्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. १९६२ नंतर अविश्वास प्रस्तावामुळे सत्ता गमावलेले हे पहिलेच सरकार आहे.
अविश्वास प्रस्तावाच्या बाजुने ३३१ मते पडली. हा प्रस्ताव जिंकण्यासाठी २८८ मतांची गरज होती. फ्रान्समध्ये जूनमध्येच निवडणूक झाली होती. परंतू कोणालाच त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. आता मॅक्रो यांनी राजीनामा देण्यासाठी विरोधक दबाव टाकत असून आज मॅक्रो देशाला संबोधित करणार आहेत. बार्नियर यांची निवड मॅक्रो यांनीच केली होती.
फ्रान्समध्ये मॅक्रो यांचे सेट्रलिस्ट सहकारी, डाव्या विचारसणीचा न्यू पॉप्युलर फ्रंट आणि दणिणपंथी नॅशनल रॅली असे तीन पक्ष निवडून आले आहेत. मॅक्रो यांनी सेट्रलिस्टचा पंतप्रधान केला होता. तर उर्वरित दोन्ही पक्षांमधून विस्तवही जात नव्हता, यामुळे ते सत्ता स्थापन करू शकले नव्हते. अर्थसंकल्पाच्या वादातून हे दोन्ही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकारच उलथवून टाकले आहे.