शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

गाझात अडकले चार भारतीय, त्यांची सुटका करणे मुश्किल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 05:50 IST

परराष्ट्र खात्याची कबुली; इस्रायलमधून आतापर्यंत १२०० भारतीय मायदेशात

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गाझामध्ये चार भारतीय अडकले असून त्यांची तेथून सुटका करणे तितकेसे सोपे नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. या मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, गाझामधील स्थिती सुधारली की या चौघांना भारतात आणण्याची व्यवस्था केली जाईल. ऑपरेशन अजयच्या माध्यमातून इस्रायलमधून आतापर्यंत १२०० जणांना भारतात परत आणण्यात आले आहे. त्यात १८ नेपाळी नागरिकांचा समावेश आहे.

इस्रायलमध्ये अनेक भारतीय अडकले असून त्यांना आणण्यासाठी आणखी विमाने पाठविण्यात येणार आहे. इस्रायल व पॅलेस्टाइन या दोन्ही राष्ट्रांना भारताचा पाठिंबा आहे. २००० सालापासून ते आतापर्यंत भारताने पॅलेस्टाइनला विविध प्रकारे मदत केली, असेही ते म्हणाले.

‘सेफ झोन’वरही दिवसरात्र हल्लेइस्रायलने गुरुवारीही गाझा पट्टी ओलांडून सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले. हमासच्या विध्वंसक हल्ल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांपासून इस्रायली सैन्याकडून सतत हल्ले सुरू आहे.

महिला लीडर ठारnगाझावरील हल्ल्यात हमासची एकमेव महिला लीडर जमिला अल-शांती मारली गेल्याचे संरक्षण दलाने म्हटले आहे. nती हमासचा सहसंस्थापक अब्देल अझीझ अल-रंतिसीची पत्नी होती. २०२१ पासून ती सक्रीय होती. 

गाझात दिवसातून एकदाच जेवणइस्रायलने गाझाचा इंधन, पाणी, वीज तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा गेल्या काही दिवसांपासून रोखला आहे. यामुळे अनेक नागरिक दिवसातून केवळ एकवेळ जेवण करत आहेत. पाणीच नसल्याने अतिशय अशुद्ध पाणीही ते पीत आहेत.

हमासला उत्तर कोरियाची शस्त्रे? nइस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हल्ला करण्याकरिता हमासच्या दहशतवाद्यांनी उत्तर कोरियाने निर्मिलेल्या शस्त्रांचा वापर केल्याचे म्हटले जात आहे.nआम्ही कोणालाही शस्त्रे पुरविली नसल्याचे उत्तर कोरियाने स्पष्ट केले.  

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध