शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

...अन् आजारी मुलांसाठी बराक ओबामा झाले सांताक्लॉज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 16:18 IST

अमेरिकेच्या माजी अध्यक्षांनी रुग्णालयात साजरा केला ख्रिसमस

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा लहान मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. अध्यक्ष असताना त्यांनी अनेकदा लहान मुलांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. आताही ते लहान मुलांसोबत ख्रिसमस साजरा करण्यात मग्न आहेत. विशेष म्हणजे यंदाचा ख्रिसमस ते आजारी मुलांसोबत साजरा करत आहेत. वॉशिंग्टनमध्ये एका रुग्णालयातील आजारी मुलांना भेटत त्यांनी भेटवस्तूंचं वाटप केलं. विशेष म्हणजे या मुलांसाठी ओबामा सांताक्लॉज झाले होते. आठ वर्षे अमेरिकेचे अध्यक्ष राहिलेले ओबामा साध्या कपड्यांमध्ये खांद्यावर बॅग घेऊन रुग्णालयात पोहोचले. ओबामांना पाहून लहान मुलंदेखील खूश झाली. ओबामांनी मुलांना भेटवस्तू दिल्या. त्यानंतर मुलांनी माजी अध्यक्षांसोबत मजामस्ती केली आणि फोटोदेखील काढले. या भेटीचा व्हिडीओ ओबामा यांनी शेअर केला आहे. लहान मुलांसोबत वेळ घालवू दिल्याबद्दल ओबामांनी रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानत ख्रिसमसच्या शुभेच्छादेखील दिल्या आहेत.  बराक ओबामा सध्या वॉशिंग्टनमध्ये वास्तव्यास आहेत. ते सध्या त्यांच्या संस्थेच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. गेल्या वर्षी त्यांनी पत्नी मिशेलसोबत शाळेतील विद्यार्थ्यांसोबत ख्रिसमस साजरा केला होता. याशिवाय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात स्वत:च्या पक्षाला बळकटी देण्याचाही प्रयत्न करत आहेत.  

टॅग्स :USअमेरिकाChristmasनाताळ