शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, पॉर्न स्टारला पैसे दिल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 06:33 IST

ट्रम्प टॉवर ते कोर्टापर्यंत ३५ हजार पोलिस तैनात, गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणारे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष

न्यूयॉर्क : २०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या प्रचारादरम्यान गप्प राहण्यासाठी पॉर्न स्टारला पैसे दिल्याचा आरोप असलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली आहे. मॅनहॅटन न्यायालयात त्यांना हजर केले असून, त्यांच्याविरोधात तिथे भारतीय वेळेनुसार रात्री १२ नंतर खटल्याची सुनावणी सुरू झाली हाेती.

तसेच ट्रम्प हे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणारे देशाचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. आपल्यावरील आरोपांचे ट्रम्प खंडन करणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. या काेर्टाचे जज डेमाेक्रॅटिक असल्याचा आराेप त्यांच्या मुलाने केला आहे. ट्रम्प कार्टात हजर राहण्यासाठी निघाले तेव्हा रस्त्यांवर त्यांचे हजारो समर्थक होते. ट्रम्प टॉवर ते  मॅनहॅटन न्यायालयापर्यंत ३५ हजार पोलिस तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचे रूप आले होते.

लेट नाइट अपडेट्स

भारतीय वेळेनुसार रात्री १२:०५ वाजता त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. त्याआधी ११.५५ वाजता त्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आले.

 काय आहे प्रकरण?

पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला २०१६ मध्ये १.३ लाख डॉलर्स देण्यात ट्रम्प यांच्या सहभागाच्या चौकशीशी संबंधित हे प्रकरण आहे. ट्रम्प यांच्यासोबतच्या कथित लैंगिक संबंधांबाबत शांत राहण्यासाठी डॅनियल्सला हे पैसे देण्यात आल्याचा आरोप आहे.

विश्वास होत नाही की हे सारे काही अमेरिकेतच होत आहे. -डोनाल्ड ट्रम्प

सोशल मीडियावर म्हटले... मला ते अटकच करतील

मॅनहॅटन येथील न्यायालयात हजर राहण्यासाठी निघाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, हे तर पक्कच आहे की, ते मला अटकच करतील. जेव्हा ते कोर्टाच्या आवारात पोहोचले तेव्हा त्यांनी प्रथम आपल्या चाहत्यांना हात उंचावून विजयाची आशा असल्याची खूण केली.

सुरू केली होती राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या रेसची तयारी...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मॅनहटन न्यायालयात फौजदारी खटला चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या नंतर  चोवीस तासांत त्यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून ३२ कोटी ८७ लाख रुपये (४० लाख डाॅलर) इतका निधी गोळा केला होता. पण या खटल्याने त्यांच्या या निवडणुकीला बळ मिळणार की त्यांच्या इच्छांवर पाणी फेरले जाणार, हे येणारा काळच ठरवेल. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका