शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

...तर तिसरे महायुद्ध : रशियाचा इशारा; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली टीका जिव्हारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:25 IST

रशियाच्या माजी अध्यक्षांची धमकी; म्हणाले, मला एकच गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे महायुद्ध

मॉस्को: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे युक्रेनशी युद्ध सुरू ठेवून आगीशी खेळत आहेत, अशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली प्रखर टीका रशियाच्या जिव्हारी लागली आहे. या प्रकारानंतर रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे.

युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रे व ड्रोन हल्ल्यानंतर अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रशियावर अमेरिका नव्याने बंदी लादण्याचा विचार करीत आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यानंतर हा इशारा आला आहे. रशिया आगीशी खेळत आहे आणि ही खरोखरच वाईट गोष्ट आहे, असे ट्रम्प म्हणाले होते. त्यावर मेदवेदेव यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मला फक्त एकच वाईट गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे तिसरे महायुद्ध. मेदवेदेव यांनी २००८ ते २०१२ दरम्यान रशियाचे अध्यक्ष व २०१२ ते २०२० पर्यंत पंतप्रधान पदावर काम

अमेरिकेला न जुमानता झेलेन्स्की यांची बर्लिनमध्ये भेट बर्लिन

रशियाबरोबरच्या युद्धात आपल्याला आणखी लष्करी मदत मिळावी, यासाठी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी बर्लिनला भेट दिली आहे. नवीन जर्मन चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची त्यांनी भेट घेत चर्चा केली. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली युद्ध समाप्त करण्याच्या प्रयत्नांना न जुमानता त्यांनी पाऊल उचलले. 

जर्मनी हा अमेरिकेनंतर युक्रेनला लष्करी मदत देणारा सर्वांत मोठा दुसरा देश आहे. युद्धबंदी करण्यासाठी व युक्रेनचा पाश्चात्त्य पाठिंबा अबाधित ठेवण्यासाठी मर्झ हे सक्रियपणे प्रयत्न करीत आहेत. पुतिन यांनी शांतता चर्चेला खीळ घातल्याचा आरोप युरोपीय नेत्यांनी केला आहे.

ट्रम्प म्हणाले, आगीशी खेळ 

युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांनी वेग घेतला असला तरी पुतिन यांनी चर्चा थांबवल्याचा आरोप आहे. मी नसतो तर रशियासोबत खूप वाईट गोष्टी घडल्या असत्या. ते आगीशी खेळत आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

पुतिन म्हणाले... 

समानता आणि अविभाज्यतेच्या तत्त्वांवर आधारित नवीन जागतिक सुरक्षा संरचना हवी आहे. सर्व देशांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेची ठोस हमी मिळाली पाहिजे, असे पुतिन यांनी म्हटले आहे.

प्रमुख हमास नेता ठार 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की इस्रायलने प्रमुख हमास नेत्यांपैकी एक मोहम्मद सिनवार याला ठार केले. सिनवार हा हमास नेता याह्या सिनवारचा भाऊ आहे, जो ७ ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्याचा सूत्रधार होता. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प