शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'मुंबईवरील 26/11चा हल्ला भारतानंच घडवून आणला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 12:43 IST

पाकिस्तानच्या माजी गृहमंत्र्यांचं वादग्रस्त विधान

नवी दिल्ली: मुंबईवरील 26/11 हल्ल्याबद्दल माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केलेल्या विधानानं अडचणीत सापडलेल्या पाकिस्ताननं आता नवा कांगावा सुरू केला आहे. भारतानंच मुंबईवरील हल्ला घडवून आणला, असा अजब दावा पाकिस्तानचे माजी गृहमंत्री रहमान मलिक यांनी केला आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्यामागे भारताची गुप्तहेर यंत्रणा रॉचा हात आहे, असे अकलेचे तारेदेखील मलिक यांनी तोडले आहेत. '26/11 चा हल्ला रॉने घडवून आणला. या हल्ल्याला पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा होता. काश्मीरमधील मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या घटनांकडे जगाचं दुर्लक्ष व्हावं, यासाठी हा हल्ला घडवून आणण्यात आला,' असं मलिक यांनी म्हटलं. या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग नव्हता, असंदेखील ते म्हणाले. 'पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं. त्यांच्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची प्रतिमा डागाळली जात आहे,' असं मलिक यांनी म्हटलं. नवाज शरीफ यांनी शनिवारी दिलेल्या मुलाखतीत मुंबई हल्ल्याबद्दल महत्त्वपूर्ण विधान केलं होतं. 26/11 चा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवून आणला, अशी कबुली शरीफ यांनी दिली होती.  नवाज शरीफ यांच्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची नाचक्की झाली. त्यामुळे शरीफ यांनी सारवासारव करत, भारतीय माध्यमांनी विधानाची तोडमोड करुन अर्थाचा अनर्थ केल्याचं म्हटलं. हाच संदर्भ देत, शरीफ यांनी त्यांचं विधान मागे घ्यावं, असं मलिक म्हणाले. 'स्टेट अॅक्टर्स आणि नॉन स्टेट अॅक्टर्स यामध्ये फरक आहे. शरीफ यांनी तो लक्षात घेण्याची गरज आहे. नॉन स्टेट अॅक्टर्स फक्त त्यांची उद्दिष्टं साध्य करण्यासाठी पाकिस्तानचा वापर करतात,' असं मलिक यांनी म्हटलं.  

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान