शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
2
युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'
3
आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?
4
ENG vs IND : गिल-जड्डू जोडी जमली! अर्धा संघ तंबूत परतल्यावर टीम इंडियानं साधला 'त्रिशतकी' डाव
5
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
6
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल
7
कॅप्टन्सीत शतकी 'रोमान्स'! शुबमन गिलनं मारली विराटसह या दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री
8
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
9
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
10
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
11
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
12
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
13
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
14
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
15
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
16
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
17
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
18
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
19
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
20
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 18:43 IST

ढाका येथील एका विशेष कोर्टाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ६ महिन्यांची जेलची शिक्षा सुनावली आहे.

ढाका येथील एका विशेष कोर्टाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ६ महिन्यांची जेलची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा झाली आहे. हा निर्णय आयसीटी-१ (International Crimes Tribunal - ICT) या तीन न्यायाधीशांच्या बेंचने दिला आहे.

कोर्टाने सांगितलं की, शेख हसीनांनी अशी काही विधानं केली ज्यामुळे न्यायालयाचा अनादर झाला आणि न्यायव्यवस्थेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

नेमकं प्रकरण काय?

बांगलादेशी मीडियानुसार, हे प्रकरण गेल्या वर्षी ऑक्टोबरमधील आहे. त्यावेळी एक फोन कॉल लीक झाला होता. या ऑडिओ क्लिपमध्ये शेख हसीना यांचाच आवाज असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यात त्या म्हणत होत्या की, त्यांच्यावर २२७ केसेस दाखल आहेत, त्यामुळे त्यांना २२७ लोकांना मारण्याचा परवानाच मिळाला आहे. त्यांच्या याच वक्तव्याला कोर्टाने न्यायालयाचा अवमान मानलं.

आयसीटी हे बांगलादेशच्या १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धातील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी बनवलेलं विशेष कोर्ट आहे. असं मानलं जातंय की, मोहम्मद युनूस हे या कोर्टाचा वापर शेख हसीना आणि त्यांच्या पक्षाचं राजकारण कायमचं संपवण्यासाठी करत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शेख हसीनांचं सरकार पडलं होतं आणि त्यानंतर मोहम्मद युनूस हे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार बनले आहेत.

शेख हसीना आणि मोहम्मद युनूस यांचा जुना वाद!शेख हसीना आणि मोहम्मद युनूस यांच्यातील जुना वाद काही लपून राहिलेला नाही. युनूस यांना जेव्हा 'मायक्रोफायनान्स' मॉडेलसाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आणि ते जगात प्रसिद्ध झाले, तेव्हा शेख हसीनांना ते आवडलं नव्हतं. त्यांनी युनूस यांच्यावर करचोरी आणि गैरव्यवहाराचे आरोप केले. इतकंच नाही, तर त्यांना 'ग्रामीण बँक'मधून काढण्याचाही प्रयत्न केला. यावर युनूस यांनीही अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवरून बांगलादेश सरकारवर टीका केली, ज्यामुळे त्यांचे संबंध आणखी खराब झाले.

कोण आहेत शेख हसीना?शेख हसीना या बांगलादेशच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावशाली राजकारणी मानल्या जातात. त्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि "अवामी लीग" या पक्षाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. त्यांचं राजकीय जीवन बांगलादेशच्या स्वातंत्र्याशी, लोकशाहीशी आणि संघर्षांशी खूप जवळून जोडलेलं आहे. शेख हसीना यांचा जन्म २८ सप्टेंबर १९४७ रोजी बांगलादेशातील तुंगीपाडा येथे झाला. त्या बांगलादेशचे संस्थापक आणि पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत. १९७५ मध्ये जेव्हा शेख मुजीब आणि त्यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्यांना एका लष्करी उठावात मारण्यात आलं, तेव्हा शेख हसीना आणि त्यांची बहीण परदेशात असल्याने वाचल्या होत्या.

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय