शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील परदेशी विद्यार्थी मोठ्या संकटात; थेट देशाबाहेर काढण्यासाठी नवनव्या युक्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:55 IST

अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे.अमेरिकेत व्हिसा रद्द केलेल्या काही विद्यार्थ्यांवर पॅलेस्टिनींचे समर्थन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे परदेशी विद्यार्थ्यांवरील कारवायांच्या पार्श्वभूमीवर येथील महाविद्यालयांचे धाबे दणाणले आहे. विद्यार्थ्यांना देशाबाहेर काढण्यासाठी नवनवीन आरोप आणि युक्त्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप या महाविद्यालयांनी केला आहे. याच प्रकारे कारवाई होत राहिली तर अमेरिकेतील संस्थांत शिक्षण घेण्यासाठी परदेशातून कुणीच येणार नाहीत. या कारवाईत अनेक विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून होमलँड सिक्युरिटीने त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. 

क्षुल्लक कारणे अन्...मिनेसोटा विद्यापीठातील विद्यार्थ्याला ताब्यात घेत त्याच्याकडे आक्षेपार्ह नोंदी आढळल्याचे कारण देत व्हिसा रद्द केला गेला. मात्र, प्रत्यक्षात या विद्यार्थ्याला झालेली अटक मद्यप्राशन करून वाहन चालवण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे.

भवितव्य अंधारातपूर्वी परदेशी विद्यार्थ्यांना अनेकदा अभ्यास पूर्ण करण्यासाठी काही प्रमाणात सवलती मिळत होत्या. आता डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यापासून पूर्वीच्या या सर्व सवलती बंद करून कठोर आदेश दिले जात आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे.अमेरिकेत व्हिसा रद्द केलेल्या काही विद्यार्थ्यांवर पॅलेस्टिनींचे समर्थन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे, तर काहींना अगदी क्षुल्लक कारणांमुळे अशा कारवाईला सामोरे जावे लागले आहे. 

अटक होण्याचाही धोकागेल्यावर्षी किंवा त्यापूर्वी एखाद्या आंदोलनात किंवा चळवळीत सहभागी परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेत प्रामुख्याने लक्ष्य केले जात आहे. परराष्ट्र मंत्री मॅक्रो रुबियो यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. उच्चशिक्षण आणि इमिग्रेशनसंबंधी विभागाचे सीईओ मिरियम फेडब्लम यांनी सांगितले, आता विद्यार्थ्यांच्या व्हिसासह अधिकृत वास्तव्याचा दर्जाच रद्द केला जात आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना अटक होण्याचाही धोका आहे.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीAmericaअमेरिका