शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
5
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
6
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
7
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
8
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
9
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
10
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
11
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
12
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
13
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
14
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
15
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
16
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:32 IST

ब्रिटनची गुप्तचर संस्था MI6 च्या प्रमुखपदी पहिल्यांदाच एका महिलेची वर्णी; कोण आहेत ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या...

MI6: तुमच्यापैकी अनेकांनी जेम्स बाँडचे हॉलिवूड चित्रपट पाहिले असतील. या चित्रपटांमध्ये ‘जेम्स बाँड’ ब्रिटनच्या गुप्तचर संस्था MI6 साठी काम करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, चित्रपटात या संस्थेच्या प्रमुखपदी महिला दाखवण्यात आली होती, पण प्रत्यक्षात मात्र महिलेला या पदावर काम करण्याची संधी कधी मिळाली नाही. मात्र, आता MI6 संस्तेच्या 115 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या परराष्ट्र गुप्तचर संस्थेची जबाबदारी एका महिलेकडे सोपवण्यात आली आहे. 

दोन दशकांपासून गुप्तचर सेवांमध्ये काम करणाऱ्या ब्लेझ मेट्रेवेली(Blaise Metreweli) लवकरच MI6 च्या प्रमुखपदाची जबाबदारी हाती घेणार आहेत. त्या सध्याचे प्रमुख रिचर्ड मूर यांची जागा घेतील. मूर 2020 पासून या पदावर आहेत. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी ही माहिती दिली. 47 वर्षीय मेट्रेवेली यांनी 1999 मध्ये MI6 मध्ये आपली कारकीर्द सुरू केली. सध्या त्या एजन्सीच्या टेक्नोलॉजी आणि इनोव्हेशन विभागाच्या प्रमुख आहेत. 

गुप्तचर सेवांमध्ये दीर्घ अनुभवमेट्रेवेली यांनी कॅम्ब्रिज यूनिव्हर्सिटीतून मानवविज्ञानमध्ये डिग्री प्राप्त केली आहे. त्यानंतर 1999 मध्ये MI6 मध्ये आपल्या कार्याची सुरुवात केली. ब्लेझ मेट्रेवेली यांनी MI6 आणि ब्रिटनची देशांतर्गत गुप्तचर संस्था MI5, या दोन्ही ठिकाणी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीचा बहुतेक काळ मध्य पूर्व आणि युरोपमध्ये ऑपरेशनल भूमिकांमध्ये गेला आहे. 2024 मध्ये मेट्रेवेली यांना ब्रिटिश परराष्ट्र धोरणातील योगदानाबद्दल ऑर्डर ऑफ सेंट मायकेल अँड सेंट जॉर्ज (CMG) सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

माझ्यासाठी अभिमानाचा क्षणमेट्रेवेली यांनी त्यांची या पदासाठी निवड झाल्याने अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, MI6, MI5 आणि GCHQ सोबत मिळून ब्रिटिश नागरिकांची सुरक्षा आणि यूकेच्या हितांना सांभाळण्याचे महत्वपूर्ण भूमिका आहे. डिजिटल युगात बायोमेट्रिक निगराणी आणि सायबर धोक्यांची जोखीम वाढलेली आहे. याकडे पाहता MI6 ला तंत्रज्ञान आव्हानांशी तालमेल जुळवावा लागणार आहे. हे अभियान पुढे नेण्यासाठी मी आमच्या धाडसी अधिकारी, एजंट आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत काम करण्यास सज्ज आहे.

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयWomenमहिलाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स