शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

साखर २९० रुपये तर तांदूळ ५०० रुपये किलो! भारताचा शेजारी श्रीलंका आर्थिक संकटाच्या खाईत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 06:04 IST

पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताचा शेजारी देश श्रीलंका प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात  सापडला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे देशासमोर भूकबळीचे संकट उभे राहिले आहे. पेट्रोल-डिझेलची इतकी टंचाई निर्माण झाली आहे की, पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात करण्यात आले आहे.१९४८ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, श्रीलंका प्रथमच एवढ्या भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. श्रीलंकेतील खाद्य क्षेत्रातील महागाई २५.७ टक्क्यांवर पोहोचली आहे. सकाळच्या एक कप चहाची किंमत १०० रुपये झाली आहे. साखर २९० रुपये किलो, तर तांदूळ ५०० रुपये किलो झाले आहे. ४०० ग्रॅम दूध पावडरचा दर ७९० रुपये झाला आहे. श्रीलंकेच्या आर्थिक संकटामागे डॉलरची टंचाई हे प्रमुख कारण आहे. श्रीलंका तेल, अन्न, कागद, साखर, डाळी, औषधी इत्यादी सर्वच आवश्यक वस्तूंची आयात करतो; पण सध्या या देशाकडे आयातीसाठी विदेशी चलनच उपलब्ध नाही. मार्चमध्ये श्रीलंका सरकारकडे फक्त २.३६ अब्ज डॉलर शिल्लक आहेत. परीक्षेचे पेपर छापण्यासाठीही सरकारकडे पैसे नाहीत.दोन आठवड्यांपूर्वी येथील पेट्रोलचे दर ५० रुपयांपर्यंत, तर डिझेलचे दर ७५ रुपयांपर्यंत वाढविण्यात आले होते. आता तेथे पेट्रोल २५४ रुपये लिटर तर डिझेल १७६ रुपये लिटर झाले आहे. पेट्रोल-डिझेल खरेदी करण्याच्या प्रयत्नात अनेक लोकांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात करण्यात आले आहे. २० टक्के लोक स्वयंपाकासाठी इंधन म्हणून रॉकेलचा वापर करतात; पण रॉकेलही मिळेनासे झाले आहे. पेट्रोलियम जनरल एम्प्लॉइज युनियनचे अध्यक्ष अशोक रानवाला यांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या अनुपलब्धतेमुळे सरकारला आपली एकमात्र रिफायनरीही बंद करावी लागली आहे. १२.५ किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात १,३५९ रुपयांची वाढ झाली आहे. आता सिलिंडरची किंमत ४,११९ रुपये झाली आहे.चीनने हात झटकलेश्रीलंकेतील आर्थिक संकटास चीन जबाबदार असल्याचे मानले जात आहे. श्रीलंकेने चीनकडून एकूण ५ अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे. भारत आणि जपानचे कर्जही या देशावर आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोतबाया राजपक्षे यांनी कर्जाच्या अटी शिथिल करण्याची विनंती चीनला केली होती. तथापि, चीनने ती फेटाळून लावली.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका