शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विमान-रेल्वे...सगळं काही ठप्प; मेलोनींच्या इटलीमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 21:22 IST

जॉर्जिया मेलोनींच्या इटलीमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वातील इटलीमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील बहुतांश वाहतूकदारांनी(ट्रांसपोर्टर्स) 9 ते 12 एप्रिलदरम्यान देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात विमान कंपन्यांपासून ते रेल्वे अन् खासगी क्षेत्रातील लोकांनी भाग घेतला आहे. त्यामुळेच चार दिवस देशभरातील लोकांचे जीवन कठीण झाले आहे. मेलोनी सरकार हा संप संपवण्याच्या दिशेने पाऊले उचलत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बजेट एअरलाइन इझीजेटच्या फ्लाइट असिस्टंटनी 9 एप्रिल रोजी चार तासांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत हा संप चालला. कामगार करार सुधारण्यासाठी सुरू असलेल्या चर्चा अयशस्वी झाल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. इझीजेटने अद्याप कोणतीही उड्डाणे रद्द केलेली नसली तरी, प्रवाशांना त्यांच्या उड्डाणांबद्दल माहिती एअरलाइनकडून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांचाही संपरेल्वे प्रवाशांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एसआय-कोबास युनियनने 10 एप्रिल रोजी रात्री 9 ते 11 एप्रिल रोजी रात्री 9 पर्यंत 24 तासांचा रेल्वे संप पुकारला आहे. या गाड्या चालवणारी कंपनी ट्रेनॉर्डने म्हटले आहे की, या संपामुळे प्रादेशिक आणि लांब पल्ल्याच्या सेवांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, काही अत्यावश्यक सेवा सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहतील.

मेलोनी सरकारसाठी अग्निपरीक्षाया संपांमुळे मेलोनी सरकारसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. केवळ कामगार संघटनाच संतप्त नाहीत, तर सामान्य जनताही गैरसोयींमुळे त्रस्त आहे. वाहतूक क्षेत्रातील या अशांततेचा इटलीच्या प्रतिमेवरही परिणाम होत आहे, विशेषतः देश पर्यटन हंगामाकडे वाटचाल करत असताना हा संप पुकारल्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. आता मेलोनी सरकार या संकटाचा कसा सामना करते आणि प्रवाशांना लवकरच दिलासा मिळतो का हे पाहणे बाकी आहे.

टॅग्स :ItalyइटलीInternationalआंतरराष्ट्रीय