शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

अमेरिकेत स्वकष्टाने श्रीमंत झालेल्या महिलांमध्ये पाच भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 06:15 IST

फोर्ब्सच्या यादीत मराठमोळ्या नेहा नारखेडेंचाही समावेश; इंद्रा नुयी ९१ व्या स्थानावर

नवी दिल्ली : प्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने जारी केलेल्या ‘अमेरिकेच्या स्वकष्टार्जित श्रीमंत महिला’ या यादीत भारतीय वंशाच्या ५ महिलांनी स्थान मिळविले आहे. क्लाऊड क्षेत्रातील कंपनी कॉन्फ्युएन्टच्या सहसंस्थापिका व माजी तंत्रज्ञान अधिकारी नेहा नारखेडे, पेप्सिकोच्या माजी चेअरमन व सीईओ इंद्रा नुयी, सिंटेलच्या सहसंस्थापिका नीरजा सेठी, अरिस्टा नेटवर्कच्या अध्यक्ष व सीईओ जयश्री उलाल आणि गिंगको बायोवर्क्सच्या सहसंस्थापिका रेशमा शेट्टी यांचा त्यात समावेश आहे. फोर्ब्सच्या माहितीनुसार, इंद्रा नुयी यांची संपत्ती २९० दशलक्ष डॉलर आहे. त्यांचा यादीत ९१ वा क्रमांक लागला. जयश्री उलाल यांची संपत्ती १.७ अब्ज डॉलर असून त्यांचा १६ वा क्रमांक आहे. नीरजा सेठी यांची संपत्ती १ अब्ज डॉलर असून यादीत त्यांचा क्रमांक २६ वा आहे. नेहा नारखेडे यांची संपत्ती ९२५ दशलक्ष डॉलर असून फोर्ब्सच्या यादीतील त्यांचा क्रमांक २९ वा आहे. रेश्मा शेट्टी यांची संपत्ती ७५० दशलक्ष डॉलर असून फोर्ब्सच्या यादीत त्यांनी ३९ वे स्थान पटकावले आहे.