शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्या आश्वासनांमुळे पहिल्यांदाच डाऊ जोन्सचा सेन्सेक्स झेपावला

By admin | Updated: January 25, 2017 21:46 IST

अमेरिकी शेअर बाजारातील नावाजलेल्या डाऊ जोन्सचा निर्देशांक पहिल्यांदाच इतर कंपन्यांच्या तुलनेत 100 अंकांनी वधारला आहे.

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 25 - अमेरिकी शेअर बाजारातील नावाजलेल्या डाऊ जोन्सचा निर्देशांक पहिल्यांदाच इतर कंपन्यांच्या तुलनेत 100 अंकांनी वधारला आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डाऊ जोन्सचा निर्देशांकात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे डाऊ जोन्सचा निर्देशांक वाढवण्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉल स्ट्रीटवर अतिउत्साहाच्या भरात दिलेली आश्वासनं कारणीभूत ठरली आहेत. शेअर मार्केट उघडताच डाऊ जोन्सच्या निर्देशांकांनी इतर कंपन्यांच्या तुलनेत 100 अंकांनी वधारून 20 हजारांपर्यंतची उसळी घेतली. त्यामुळे अमेरिकेतील शेअर बाजारात उत्साह संचारला. अचानक शेअर बाजारानं उसळी घेतल्यानं बाजार विश्लेषकांच्याही भुवया उंचावल्या आहेत.दरम्यान, व्यापारीवर्ग आता पायाभूत सुविधांवर किती खर्च करण्यात येतो आहे, याची माहिती गोळा करत आहे. त्यांचा दृष्टिकोन एकदम स्पष्ट आहे, असं बाजारपेठ प्रमुख आणि बाजार विश्लेषक नईम अस्लाम म्हणाले आहेत. एस अँड पी 500  निर्देशांक 0.4 टक्क्यांनी वधारला आहे. 
डाऊ जोन्सचा निर्देशांक वधारल्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला याचा फायदा होणार असल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर राबवलेल्या विकासाच्या धोरणांमुळे ही वाढ नोंदवली गेल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. तर ट्रम्प यांनी एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर स्वाक्षरी केली असून, तेही एक कारण शेअर बाजारात उत्साह संचारण्यासाठी कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. डाऊ जोन्सचा निर्देशांक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर गुंतवणूकदारांनीही कंपन्यांच्या तिमाही निकालावर लक्ष्य केंद्रित केलं आहे.