शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मुलासोबत हॉटेलमध्ये दिसली मॉडेल, राष्ट्रपतींच्या पत्नीने बदडलं

By sagar.sirsat | Updated: August 16, 2017 19:07 IST

ती मॉडेल एका मित्रासोबत राष्ट्रपतींच्या मुलांची भेट घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेली होती. कॅपिटल 20 वेस्ट या हॉटेलच्या रूममध्ये त्यांची भेट घेत असतानाच...

ठळक मुद्देझिम्बाब्वेचे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांची पत्नी ग्रेस मुगाबे यांच्यावर एका 20 वर्षीय मॉडेल तरूणीला मारहाण करण्याचा आरोप आहे. राष्ट्रपतींच्या पत्नीने आपल्यावर हल्ला करून जखमी केल्याची तक्रार

जोहान्सबर्ग, दि. 16 - झिम्बाब्वेचे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांची पत्नी ग्रेस मुगाबे यांच्यावर एका 20 वर्षीय मॉडेल तरूणीला मारहाण करण्याचा आरोप आहे. याबाबत त्या मॉडेलने दक्षिण आफ्रिका पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.  राष्ट्रपतींच्या पत्नीने आपल्यावर हल्ला करून जखमी केल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. या हल्ल्यामुळे कपाळावर झालेल्या जखमेचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

20 वर्षीय मॉडेल गॅब्रिएला एंजेल्स ही दक्षिण आफ्रिकेची आहे. या प्रकरणात ग्रेस मुगाबे यांनी दक्षिण आफ्रिकेच्या न्यायालयात हजेरी लावणं गरजेचं होतं. पण त्या न्यायालयात उपस्थित राहिल्या नाहीत. प्रकरणाच्या चौकशीमध्ये ग्रेस मुगाबे सहकार्य करत होत्या, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नव्हती. मंगळवारी त्या न्यायालयात उपस्थित राहणार होत्या, पण आम्हाला आश्वासन दिल्यानंतरही त्या कोर्टात हजर राहिल्या नाहीत अशी माहिती दक्षिण अफ्रीकेचे पोलीस प्रमुख फीकिले बालूला यांनी दिली.

मीडिया रिपोर्टनुसार,  रॉबर्ट मुगाबे यांची पत्नी ग्रेस मुगाबे जोहान्सबर्ग येथील एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. तेथे आपल्या दोन मुलांना मॉडेल गॅब्रिएला एंजेल्स हिच्यासोबत पाहून त्यांचा राग अनावर झाला. त्यानंतर त्यांनी गॅब्रिएला एंजेल्स हिच्यावर हल्ला करत तिला मारहाण केली आणि जखमी केलं.  दक्षिण अफ्रीकेच्या एका न्युज वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, मॉडेल गॅब्रिएला आपल्या एका मित्रासोबत मुगाबे यांच्या मुलांची (रॉबर्ट आणि चाटुंगा)  भेट घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेली होती. कॅपिटल 20 वेस्ट या हॉटेलच्या रूममध्ये त्यांची भेट घेत असतानाच ग्रेस मुगाबे रूममध्ये आल्या. गॅब्रिएला हिला मुलांसोबत पाहून त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी गॅब्रिएलावर हल्ला करून तिला जखमी केलं.