ऑनलाइन लोकमत
ऑर्सा, दि. 7- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेचा विषय असतात. डोनाल्ड ट्रम्प यांचं एखादं वक्तव्य किंवा त्यांचा कुठला तरी व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतो. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांचा असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. पोलंडची फर्स्ट लेडी अँगाटा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना डावलून आधी मेलानिया यांना शेकहॅण्ड केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प हे सध्या पोलंडमध्ये आहेत. तिथे ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीचं स्वागत पोलंडचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेज डूडा आणि त्यांची पत्नी अँगाटा यां दोघांनी केलं. ट्रम्प दांम्पत्याचं राष्ट्राध्यक्षांनी शेकहॅण्ड करत स्वागत केलं. नंतर पोलंडच्या फर्स्ट लेडी अँगाटा यांना ट्रम्प दांम्पत्याचं स्वागत करायचं होतं. जेव्हा ट्रम्प यांनी अँगाटा यांना शेकहॅण्ड करण्यासाठी हात पुढे केला तेव्हा त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करत त्या मेलानिया यांच्याशी हात मिळवायला पुढे गेल्या. त्यांच्या अशा अनपेक्षित वागण्याने ट्रम्प यांचा चेहऱ्याचा पूर्ण रंग उडाल्याचं या व्हिडीओत बघायला मिळतं आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. या व्हिडिओची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओवरून नेटिझन्स डोनाल्ड ट्रम्प यांची चांगलीच खिल्ली उडवत आहेत.
Polish first Lady Agata Dudas did shake President Trump"s hand, see full video. pic.twitter.com/BOw5tY4R4R— Beatrice-Elizabeth (@MissBeaE) July 6, 2017
याआधी डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया यांनी इस्त्रायल दौऱ्या दरम्यान ट्रम्प यांचा विमानतळावर हात पकडण्यास नकार देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर इस्त्रायलच्या तेल अव्हीवमधील विमानतळावरील डोनाल्ड ट्रम्प यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती. इस्त्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू हे त्यांच्या पत्नीसह ट्रम्प दाम्पत्याच्या स्वागतासाठी विमानतळावर आले होते. विमानतळावरुन बाहेर पडत असताना नेतान्याहू त्यांच्या पत्नीचा हात पकडून चालत होते. डोनाल्ड ट्रम्पदेखील मेलानिया यांचा हात पकडायला गेले. पण मेलानिया यांनी ट्रम्प यांचा हात झटकला आणि ट्रम्प यांचा हात न पकडताच त्या पुढे गेल्या. या व्हिडीओवरुन डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली होती.
आणखी वाचा
अस्वस्थ पाकिस्तान वाघा बॉर्डरवर उभारणार भारतापेक्षा उंच ध्वज
अमित शाहांच्या ताफ्याची गाईला धडक, बीजेडी खासदारानं उडवली खिल्ली
माझ्याविरोधात RSS आणि भाजपाचा कट, पण मी घाबरणार नाही- लालू