शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
2
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
3
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
6
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
7
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
8
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
9
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
10
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
11
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
12
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
13
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
14
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
15
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
17
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
18
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
19
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
20
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार

आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:06 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताशी दहशतवादासह सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची खुली ऑफर दिल्यानंतर भारताने यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताशी दहशतवादासह सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची खुली ऑफर दिल्यानंतर भारताने यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानशी कोणताही संवाद फक्त दोन मुद्द्यांवरच शक्य आहे, त्यातील एक म्हणजे पाकिस्तानने दहशतवाद्यांचा ताबा भारताकडे द्यावा आणि दुसरा म्हणजे पाकव्याप्त काश्मीर भारताला .

परराष्ट्र मंत्रालयाने घेतली ठाम भूमिकापरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत-पाकिस्तानमधील कोणताही संवाद पूर्णपणे द्विपक्षीय स्वरूपाचा असावा, त्यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका मान्य केली जाणार नाही. त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी परदेश दौऱ्यांदरम्यान दिलेल्या चर्चेच्या प्रस्तावावर उत्तर देताना ही भूमिका मांडली.

जयस्वाल म्हणाले की, "दहशतवाद आणि संवाद एकत्र शक्य नाहीत. काही वर्षांपूर्वी आम्ही पाकिस्तानकडे कुख्यात दहशतवाद्यांची यादी सुपूर्त केली होती. त्या व्यक्तींना भारताच्या ताब्यात द्यावे, हीच आमची प्रमुख मागणी आहे."

जम्मू-काश्मीर प्रश्नावरही भारताचा स्पष्ट इशाराजम्मू आणि काश्मीरबाबत पाकिस्तान चर्चा करू इच्छितो, पण भारताने यावर ठाम भूमिका घेतली आहे की, जोपर्यंत पाकिस्तान आपल्या बेकायदेशीर ताब्यात असलेला भाग (पीओके) रिकामा करून भारताला परत करत नाही, तोपर्यंत या विषयावर कोणतीही चर्चा होणार नाही.

सिंधू करारावर देखील कठोर भूमिकासिंधू जलवाटप कराराबाबत भारताने स्पष्ट इशारा दिला आहे की, जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पूर्णपणे आणि विश्वासार्हतेने थांबवत नाही, तोपर्यंत हा करार स्थगितच राहील. जयस्वाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाची पुनरावृत्ती करत म्हटले की, “दहशतवाद आणि संवाद, दहशतवाद आणि व्यापार, आणि पाणी-रक्त हे एकत्र होऊ शकत नाहीत.”

दहशतवाद्यांच्या समर्थनाबाबत पाकिस्तानवर आरोपऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी आयोजित केलेल्या सभांमध्ये पाकिस्तान सरकारच्या नेत्यांची आणि लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती यावर प्रतिक्रिया देताना भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. जयस्वाल म्हणाले, “दहशतवाद्यांचे सत्कार, त्यांना फुलं अर्पण करणं आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणं, हे आम्हाला नवीन नाही. यावरून पुन्हा सिद्ध होतं की पाकिस्तान सरकार आणि लष्कर यांचा दहशतवाद्यांना थेट पाठिंबा आहे.”

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर