शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये ८ महिन्यांनंतर पहिला कोरोना बळी; आंतरराष्ट्रीय पथकही दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 02:46 IST

कोरोना साथीच्या प्रसारामुळे उत्तर चीनमधील २.८ कोटी लोक हे लॉकडाऊनच्या बंधनात अडकले आहेत. तसेच त्या देशातील एका प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

बीजिंग : कोरोना साथीच्या उगमस्थानाचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने पाठविलेले आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांचे एक पथक चीनमध्ये गुरुवारी दाखल झाले. त्याचवेळी या देशात मे महिन्यापासून आतापर्यंतच्या कालावधीतील पहिल्या कोरोना बळीची नोंदही गुरुवारीच झाली. 

कोरोना साथीच्या प्रसारामुळे उत्तर चीनमधील २.८ कोटी लोक हे लॉकडाऊनच्या बंधनात अडकले आहेत. तसेच त्या देशातील एका प्रांतात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. चीनमध्ये काही ठिकाणी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ही पावले उचलण्यात आली. त्या देशात आठ महिन्यांनंतर कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. हेबेई प्रांतातील या घटनेबद्दल राष्ट्रीय आरोग्य आयोगाने फारशी माहिती दिलेली नाही. चीनमध्ये शेवटचा कोरोनाचा बळी गेल्या वर्षी १७ मे रोजी नोंदविला गेला होता. त्यानंतर आता आठ महिन्यांनी नवा रुग्ण सापडला आहे.

शास्त्रज्ञ राहणार दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये चीनमध्ये दाखल झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांच्या पथकामध्ये १३ जणांचा समावेश आहे. या शास्त्रज्ञांना दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. कोरोना साथीच्या उगमस्थानाचा शोध घेण्याची मोहीम खूपच विलंबाने सुरू झाली आहे. चीनने कोरोनाचा विषाणू वुहानमधील प्रयोगशाळेत तयार केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.

टॅग्स :chinaचीनCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या