शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

जगातील पहिले प्रकरण; 36 वर्षीय व्यक्तीला एकाच वेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि HIVची लागण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 16:57 IST

जगात मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 48 हजारांवर पोहोचली असून, 102 देशांमध्ये हा रोग पसरला आहे.

कटेनिया (इटली):इटलीध्ये एका 36 वर्षीय व्यक्तीला एकाच वेळी कोरोना, मंकीपॉक्स आणि HIVची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. कॅटानिया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या मते, जगातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. या वर्षाच्या सुरुवातीला स्पेनला गेल्यानंतर या माणसाला तिन्ही आजार झाले. त्याने अनेक पुरुषांशी असुरक्षित संबंध बनवले होते, त्यामुळेच हे झाल्याची माहिती आहे.

द सनच्या वृत्तानुसार, हा व्यक्ती 16 ते 20 जून दरम्यान स्पेनमध्ये राहत होता. जर्नल ऑफ इन्फेक्शनच्या केस रिपोर्टनुसार, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे यासारख्या लक्षणांनंतर 2 जुलै रोजी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच दिवशी रुग्णाच्या डाव्या हातावर, चेहऱ्यावर, पायांवर लहान आणि वेदनादायक पुरळ उठू लागले. 

यानंतर, 5 जुलै रोजी त्यांला सॅन मार्को युनिव्हर्सिटी हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले, जिथे त्याची मंकीपॉक्सची चाचणी करण्यात आली. निकाल पॉझिटिव्ह आल्यावर लैंगिक आजारांशी संबंधित चाचण्याही करण्यात आल्या. यात त्याला ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस-1 (HIV-1) ची लागण झाल्याचेही आढळून आले. त्याला अलीकडेच एचआयव्ही संसर्ग झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मंकीपॉक्सपासून सुटका झाली11 जुलैपर्यंत रुग्णाच्या शरीरावर उगवलेला मंकीपॉक्स पुरळ सुकून गेला आणि त्याचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला. त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि काही दिवस इतरांपासून वेगळे राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संशोधकांनी सांगितले की, कोरोना आणि मंकीपॉक्सची लक्षणे ओव्हरलॅप होऊ शकतात. तसेच, मंकीपॉक्स झाल्यानंतर 20 दिवसांनंतरही रुग्ण पॉझिटिव्ह येऊ शकतो, त्यामुळे उपचार संपल्यानंतर काळजी घेणे आवश्यक आहे.

जगात मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 48 हजारांवर Monkeypoxmeter.com च्या आकडेवारीनुसार, जगात मंकीपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या 48 हजार 54 वर पोहोचली आहे. हा आजार आतापर्यंत 102 देशांमध्ये पसरला आहे. ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि ब्राझील हे टॉप 10 बाधित देशांमध्ये आहेत. भारतात मंकीपॉक्सची 10 प्रकरणे समोर आली आहेत, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील याला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMonkeyमाकडHIV-AIDSएड्सItalyइटलीWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना