शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

पृथ्वीवरील जिवाणूंची मंगळावर सर्वप्रथम वसाहत

By admin | Updated: May 5, 2014 14:58 IST

गळावर वसाहत स्थापन करण्यासाठी माणसाचे जोरदार प्रयत्न चालले असले, तरी ही स्पर्धा जिवाणू (बॅक्टेरिया) जिंकणार असून मंगळावर पहिली वसाहत या जिवाणूंचीच होईल

 वॉशिंग्टन : मंगळावर वसाहत स्थापन करण्यासाठी माणसाचे जोरदार प्रयत्न चालले असले, तरी ही स्पर्धा जिवाणू (बॅक्टेरिया) जिंकणार असून मंगळावर पहिली वसाहत या जिवाणूंचीच होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. या स्पर्धेत माणसाचा पराभवच होईल अशी दाट शक्यता दिसत आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. हे तज्ज्ञ नासाचे असून त्यात एक भारतीय अमेरिकन सदस्यही आहे.नासा या अमेरिकन अंतराळ संस्थेच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जीवाणू वा सूक्ष्म जीव अवकाशयानावर बसून मंगळावर जातात. मंगळावर त्यांची वसाहत तयार होऊ शकेल व पृथ्वीवरून मंगळावर जाणार्‍या अंतराळवीरांना ते परग्रहवासी असल्याचे वाटेल. हे जीवाणू मंगळ व इतर ग्रह प्रदूषित करतील. शास्त्रज्ञांना त्यांची उत्पत्ती पृथ्वीवर झाली की मंगळावर झाली, हे कळू शकणार नाही.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर करण्यात आलेल्या प्रयोगात सूक्ष्म जीवाणूंचा असा आंतरग्रहीय पातळीवर प्रवास होऊ शकतो, हे लक्षात आले आहे. आजपर्यंत चित्रपटात मंगळावरील परग्रहवासी पृथ्वीवर हल्ला करतात, असे दाखविण्यात आले आहे; पण परिस्थिती उलट आहे. पृथ्वीवरील जीवाणू मंगळावर वसाहत करतील. मंगळावर पाठविल्या जाणार्‍या यानाबरोबर विविध प्रकारचे सूक्ष्म जीवाणू पाठविले पाहिजेत. मंगळावर जीवन तग धरू शकते की नाही, हे या जीवाणूंच्या अस्तित्वावरून आपल्याला कळू शकेल. अलीकडेच झालेल्या संशोधनात काही सूक्ष्म जीवाणू अत्यंत कठीण परिस्थितीतही तग धरत असल्याचे आढळले आहे. अवकाश प्रवासात ते विविध प्रकारची संरक्षक यंत्रणा वापरून यानातून सुरक्षितपणे विविध ग्रहांवर पोहोचू शकतील, असे नासाच्या जेट प्रॉप्युल्जन लॅबरोटरी येथे काम करणारे भारतीय संशोधक क्षितिज जे व्यंकटेश्‍वरम यांनी म्हटले आहे. पुष्परहित वनस्पतींचे बीजकरण करणारे स्पोअर जीवाणू कोणत्याही परिस्थितीत तग धरू शकतात. बॅसिलस प्युमिलस एसएएफआर-0३२ हे जीवाणू यान स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या स्वच्छकांनाही दाद देत नाहीत, असे आढळले आहे. या जीवाणूंनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर १८ महिने तग धरली होती. अँस्ट्राबायोलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. (वृत्तसंस्था)