एकेकाळी नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित झालेले मोहम्मद युनूस बांगलादेशात सत्तेत आल्यापासून कट्टरपंथीयांच्या हाती असलेल्या कळसूत्री बाहुलीसारखे वागत असल्याचे दिसून आले आहे. युनूस यांनी बांगलादेशची सूत्रे हाती घेतल्यापासून, भारतासोबतचे संबंध बिघडत चालले आहेत. दरम्यान, युनूस यांनी आता भारतातील ईशान्येकडील सात राज्यांविषयी एक नवी योजना आखल्याचे कळत आहे.
बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या नेपाळच्या प्रतिनिधी सभागृहाचे उपसभापती यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान मोहम्मद युनूस यांनी ही चर्चा केल्याचे म्हटले जात आहे. ऊर्जा, आरोग्य सेवा आणि वाहतूक क्षेत्रात सीमापार सहकार्य वाढविण्यावर भर देताना ते म्हणाले, "बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि भारतातील ईशान्येकडील सात राज्य यांसाठी आर्थिक नियोजनाची गरज आहे." यावेळी सामायिक ऊर्जा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांद्वारे परस्पर संबंध मजबूत करण्याच्या गरजेवर देखील त्यांनी भर दिला.
एका बाणाने अनेक निशाणे साधण्याचा प्रयत्नया बैठकीत बांगलादेश, नेपाळ आणि भारत यांच्यातील अलिकडच्या वीज विक्री करारावरही चर्चा झाली, ज्याअंतर्गत नेपाळमधून भारताच्या ग्रीडद्वारे बांगलादेशला ४० मेगावॅट जलविद्युत पुरवठा केला जात आहे. मोहम्मद युनूस म्हणाले की, बांगलादेश केवळ ऊर्जाच नाही तर प्रादेशिक आरोग्य सेवेकडेही सामायिक दृष्टिकोनातून पाहतो. ते म्हणाले, "रंगपूरमध्ये बांधण्यात येणारे १००० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नेपाळ आणि भूतानमधील रुग्णांसाठी देखील खुले असेल. आम्ही प्रादेशिक आरोग्य सुरक्षा आणि सामायिक समृद्धीवर भर देणार आहोत."
चीन दौऱ्यातही भारताविरुद्ध विधानयावेळी मोहम्मद युनूस यांच्या जुन्या व्यक्तव्यांवरही चर्चा झाली. खरं तर, चीनच्या भेटीदरम्यान, युनूस यांनी बांगलादेशला चीनसाठी उत्पादन, रसद आणि व्यापाराचे प्रादेशिक केंद्र बनवण्याची बाजू मांडली होती. ते म्हणाले होते की, "ईशान्य भारतातील सात राज्ये भूपरिवेष्ठित आहेत. त्यांना समुद्रात प्रवेश नाही. आम्ही त्यांच्यासाठी समुद्राचे दार आहोत. तुम्ही बांगलादेशात उत्पादन करा, नेपाळ आणि भूतानमधून जलविद्युत घ्या आणि ती चीनमध्ये विका.' त्यांच्या या विधानावर भारतातही टीका झाली.
चीनचा काय संबंध?त्यानंतर, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल यांनी युनूस यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना एक्सवर लिहिले की, "युनूस चीनला आवाहन करत आहे की, भारतातील सात राज्ये भूपरिवेष्ठित अर्थात जमिनीवर आहेत... याचा चीनशी काय संबंध? चीनने बांगलादेशमध्ये गुंतवणूक करावी, परंतु भारताच्या अंतर्गत भूगोलाचा उल्लेख करणे चुकीचे आहे."