शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

लंडनमध्ये ऑक्सफोर्ड स्टेशनजवळ गोळीबार, भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 07:16 IST

ब्रिटनची राजधानी लंडनमधील ऑक्सफोर्ड सर्कस स्टेशनजवळ गोळीबार झाल्याची घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर स्टेशनवरील लोक धावताना दिसले.  

लंडन : ब्रिटनची राजधानी लंडनमधील ऑक्सफोर्ड सर्कस स्टेशनजवळ गोळीबार झाल्याची घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर स्टेशनवरील लोक धावताना दिसत होते. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्सफोर्ड सर्कस स्टेशनवर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी घडली. यावेळी ब्लॅकफ्रायडे निमित्ताने या स्टेशन परिसरात लोकांनी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा गोळीबार करण्यात आल्यानंतर उपस्थित लोकांनी धावपळ केली.तर, गोळीबारात एक महिला जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मेट्रोपॉलिटन आणि ब्रिटन ट्रान्सपोर्ट पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत स्टेशनवरील लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आले. तसेच, स्टेशन परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला असून ऑक्सफोर्ड सर्कस स्टेशन आणि बॉन्ड स्ट्रीट स्टेशन बंद केले आहे. दरम्यान, हा हल्ला दहशतवाद्यांनी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पुढील तपास मेट्रोपॉलिटन आणि ब्रिटन ट्रान्सपोर्ट पोलीस संयुक्तरित्या करत आहेत. मात्र, या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारली नसल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपूर्वीसुद्धा लंडनमध्ये दहशतावद्यांनी स्फोट घडवून आणला होता. भुयारी रेल्वेत 15 सप्टेंबर रोजी झालेल्या स्फोटप्रकरणी ब्रिटिश पोलिसांनी दुस-याही व्यक्तीला अटक केली होती. स्कॉटलंड यार्डच्या दहशतवादविरोधी शाखेने 21वर्षांच्या व्यक्तीला पश्चिम लंडनमध्ये अटक केली. हा स्फोट आम्ही घडविल्याचा दावा इस्लामिक स्टेटने केला होता. डोव्हर भागातील पोर्टमध्ये 18 वर्षांच्या व्यक्तीला अटक झाली असून, त्या दोघांची नावे जाहीर केलेली नाहीत. ब्रिटनच्या दहशतवाद कायद्याखाली या दोघांना अटक झाली.तत्पूर्वी सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी वर्दळीच्या भुयारी रेल्वेत झालेल्या स्फोटाने लंडन हादरले होते. या स्फोटानंतर आग भडकली. त्यात होरपळून व जीव वाचविण्याच्या धावपळीत 18 प्रवासी जखमी झाले होते. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी रेल्वेच्या एका डब्यात स्फोट झाला होता.

हा स्फोट बकेट बॉम्बचाच असल्याचा संशय पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने व्यक्त केला असून, या स्फोटासाठी अद्ययावत स्फोटक उपकरणांचा वापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. डिस्ट्रिक्ट लाइन ट्रेनच्या मागच्या डब्यातील प्लास्टीकच्या बादलीत हा स्फोट झाला. स्फोटानंतर आग भडकली. स्फोटाच्या ठिकाणी तेलकट रासायनिक पदार्थाचे ओघळ दिसून आले. स्फोटामुळे प्रवाशांत घबराट पसरली. प्रवाशांची ट्रेनमधून बाहेर पडण्याची धडपड चालू होती. अनेकांचे चेहरे होरपळले होते.पार्सन्स ग्रीन स्टेशनवर भुयारी रेल्वे पोहोचण्याआधी स्टेशनवर उतरण्यासाठी प्रवासी दरवाज्याजवळ पोहोचले होते. याच ट्रेनची वाट पाहत फलाटावर प्रवाशांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. प्रवाशांची जीव वाचविण्यासाठी धडपड चालू होती. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. दहशतवादविरोधी पथकाने पार्सन्स ग्रीन स्टेशनकडे धाव घेऊ न या प्रकाराची चौकशी सुरू केली. घटनास्थळी शहर पोलीस सेवा, ब्रिटिश वाहतूक पोलीस आणि लंडन अग्निशमन पथकासोबत रुग्णवाहिका सेवा पथकाने मदत व बचाव कार्य सुरू केले. या ट्रेनने बव्हंशी नोकरदार व विद्यार्थी प्रवास करतात. पंतप्रधान तेरेसा मे यांनी घटनेची माहिती घेतली होती.

टॅग्स :Londonलंडन