शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या उद्देशाने कसिनोमध्ये गोळीबार, 36 जणांचा मृत्यू

By admin | Updated: June 2, 2017 12:23 IST

कसिनोमध्ये शस्त्रधारी माणसाने धुमाकूळ घातला होता. यामध्ये 36 जणांचा मृत्यू झाला आहे तर 54 जण जखमी झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मनीला, दि. 2- फिलीपीन्समधील एका कसिनोमध्ये शस्त्रधारी माणसाने धुमाकूळ घातला होता. यामध्ये 36 जणांचा मृत्यू झाला आहे तर 54 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे मनीला कसिनोमध्ये एक शस्त्रधारी व्यक्ती चोरीच्या उद्देशाने आत गेला होता. कसिनोच्या आतमध्ये गेल्यावर त्याने टेलिव्हीजीन स्क्रीनवर गोळीबार करायला सुरूवात केली. या गोळीबारामुळे कसिनोमध्ये आग लागली होती. मनीला कसिनोमध्ये रात्रीच्या वेळेत बरीच लोक हजर होती. जास्त लोकांना मृत्यू धुरामुळे गुदमरून झाला आहे.
महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीने हा हल्ला केला त्या व्यक्तीचा मृतदेह हॉटेलच्या रूममध्ये सापडला आहे. हल्लेखोराने स्वतःला ब्लॅन्केटमध्ये गुंडाळलं आणि त्या ब्लॅन्केटरवर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेतल्याची माहिती पोलिस अधिकारी डेला रोसा यांनी दिली आहे. मनीला कसिनोमध्ये झालेला हल्ला दहशतवादी हल्ला नाही, कसिनोमधील ग्रीन तीप चोरी करण्यासाठी एक शस्त्रधारी व्यक्ती आला होता त्याने हल्ला घडवून आणला, अशी माहितीही डेला रोसा यांनी दिली आहे. या हल्ल्यामध्ये 54 जण जखमी झाली आहेत, त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. "कसिनोमध्ये हल्ला करणारा हल्लेखोर मूळचा युरोपीयन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हल्लेखोर इंग्लिशमध्ये बोलत होता तसंच तो उच्च आणि गोरा होता. कदाचित तो विदेशी असू शकतो", अशी शक्यता मनीला पोलिस प्रमुख ऑस्कर अल्बयाल्डे यांनी वर्तवली आहे.  
 
हल्ल्यानंतर कसिनोजवळच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे तसंच घटनेची पुढील तपासणी सुरू झाली आहे.  त्यावेळी कसिनोमध्ये असलेल्या लोकांनी चेहऱ्याला कपडा बांधलेल्या एका व्यक्तीला आत येताना पाहिलं होतं. आत येताच त्या व्यक्तीने गोळ्या झाडायला सुरूवात केली. 
मनीला कसिनोच्या मालकांनी या हल्ल्याबद्दलची अधिकृत माहिती ट्विटकरून दिली आहे. कसिनोमध्ये झालेल्या हल्ल्यात कसिनोतील 35 जणांचा मृत्यू झाला आहे तसंच त्या हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे तर 54 जण जखमी झाली आहेत. 
रिसॉर्ट वर्ल्ड मनीलाला आरडब्ल्यूएम म्हणूनही ओळखलं जातं. न्यू पोर्ट सिटीमध्ये हा रिसॉर्ट आहे.