शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सीरियात शांततेसाठी काढा तोडगा; भारताचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 07:43 IST

भारतीयांच्या सुरक्षेसाठी परराष्ट्र खाते तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात, सीरियातील बंडखोरांनी रविवारी त्या देशाची राजधानी दमास्कसवर कब्जा मिळविला व राष्ट्राध्यक्ष बशर असद यांचे सरकार उलथून टाकले.  

जेरुसलेम/नवी दिल्ली : सीरियामध्ये स्थैर्य निर्माण होण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने राजकीय प्रश्नावर तोडगा काढावा असे आवाहन भारताने केले आहे. बंडखोरांनी सीरियामध्ये सत्ता काबीज केल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे. सीरियातील बंडखोरांनी रविवारी त्या देशाची राजधानी दमास्कसवर कब्जा मिळविला व राष्ट्राध्यक्ष बशर असद यांचे सरकार उलथून टाकले. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात सोमवारी म्हटले आहे की, सीरियातील घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्या देशाची एकता, सार्वभौमत्व, अखंडता जपण्यासाठी तेथील सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. दमास्कसमधील भारतीय दूतावास तसेच सीरियामध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही त्या देशाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

सीरियातील जनतेसाठी एक ऐतिहासिक संधीगेल्या पन्नास वर्षांत अनेक निरपराध लोकांना ठार करणाऱ्या असद राजवटीचे झालेले पतन ही सीरियातील जनतेसाठी एक ऐतिहासिक संधी आहे, असे अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी सांगितले.गेली अनेक वर्षे या देशात यादवी सुरू होती. बंडखोरांनी असद यांचे सरकार उलथवून लावले. आता देशाचे भविष्य उज्ज्वल करण्याची महत्त्वाची संधी सीरियातील लोकांना मिळाली आहे. त्यांनी त्याचा योग्य उपयोग करायला हवा, असेही बायडेन यांनी सांगितले. 

इस्रायलचा रासायनिक शस्त्रे, रॉकेटच्या साठ्यावर हल्लासीरियामधील बंडखोरांच्या हाती रासायनिक शस्त्रे, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे लागू नयेत यासाठी इस्रायलने सोमवारी त्या शस्त्रसाठ्यावर हल्ला करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. इराण आणि लेबनॉनमधील हिजबुल्ला या दहशतवादी गटाचा प्रमुख सहकारी असलेला बशर असद याच्या पतनाचे इस्रायलने स्वागत केले आहे. आमच्यासाठी इस्रायलच्या नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. मात्र, सीरियात हे हल्ले कोणत्या ठिकाणी करण्यात आले हे इस्रायलने स्पष्ट केलेले नाही.

रशियाचा नेत्यांशी संपर्कसीरियामध्ये असलेल्या आपल्या लष्करी तळांवर हल्ले होऊ नये, यासाठी आता रशियाने सीरियातील नव्या नेतृत्वाशी संपर्क करण्यास सुरूवात केली आहे. 

टॅग्स :Syriaसीरिया