शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Eric Garcetti: अखेर नेमणूक झाली! एरिक गार्सेटी अमेरिकेचे भारतातील नवे राजदूत, बायडेन यांचे खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 07:54 IST

अमेरिकेतील सरकार बदलल्यानंतर राजदूत केनेथ जस्टर यांनी जानेवारी २०२१ मध्ये राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते.

लॉस अँजेलिसचे माजी महापौर एरिक गार्सेटी यांना अमेरिकेने भारतातील राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. अमेरिकेच्या संसदेने गार्सेटी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यांचे नामांकन सिनेटमध्ये 52-42 ने मंजूर झाले. भारतातील अमेरिकेचे राजदूत हे पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त होते.

गेल्या काही काळापासून रिक्त असलेली महत्त्वाची जागा भरण्यासाठी आवश्यक असलेल्या आजच्या निकालामुळे आपण खूप खूश असल्याचे गार्सेटी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. 'मी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि व्हाईट हाऊसचा आभारी आहे. भारतातील अमेरिकेची सेवा सुरु करण्यास उत्सुक आहे.', असे ते म्हणाले. 

अमेरिकेतील सरकार बदलल्यानंतर राजदूत केनेथ जस्टर यांनी जानेवारी २०२१ मध्ये राजीनामा दिला होता. जुलै 2021 मध्ये बायडेन यांनी एरिक गार्सेट्टी यांची भारतातील राजदूत म्हणून नियुक्तीची घोषणा केली. परंतू, सिनेटमध्ये पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांचे नामांकन संसदेत मतदानासाठी आणले गेले नव्हते. गेल्या आठवड्यातच समितीने मंजुरी देत यावर मतदान घेण्यासाठी सिनेटमध्ये पाठविले होते. समितीने  13-8 अशा मतांनी मंजुरी दिली होती. 

एरिक गार्सेटी यांच्या निकटवर्तीय रिक जेकब्सवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेले होते. महापौर असताना त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर होत असतो. या आरोपांमुळेच एरिक गार्सेट्टी यांची नियुक्ती होत नव्हती. रिपब्लिकन पक्षासोबतच काही डेमोक्रॅट खासदारही गार्सेटींनी भारतात नियुक्त करण्याच्या विरोधात होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या ते अत्यंत जवळचे आहेत. गार्सेटी यांना बायडेन सरकारमध्ये मंत्री पद मिळणार होते. परंतू, या आरोपांमुळे त्यांना बाजुला ठेवण्यात आले होते.  

टॅग्स :AmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन