शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलने पुन्हा धुडकावले युद्धबंदी करण्याचे आवाहन; अमेरिकेच्या मतांशी विसंगत भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 10:55 IST

ओलिसांच्या सुटकेपर्यंत माघार नाही, नेतन्याहूंचा पुनरुच्चार

खान युनिस (गाझा पट्टी) : गाझा पट्टीच्या सर्वांत मोठ्या रुग्णालयाजवळ इस्रायली सैनिक व हमासच्या दहशतवाद्यांत भीषण लढाई सुरू असून इस्रायलने शनिवारी रात्री व रविवारी सकाळी या भागात प्रचंड हवाई हल्ले केले. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धबंदीचे आंतरराष्ट्रीय समुदायाचे आवाहन पुन्हा धुडकावले असून, ओलिसांची सुटका होईपर्यंत लढाई सुरूच ठेवण्याचा पुनरुच्चार केला आहे. 

युद्ध सहाव्या आठवड्यात प्रवेश करत असताना, तात्पुरत्या युद्धबंदीसाठी इस्रायलवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. तत्पूर्वी, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी युद्धबंदीचे आंतरराष्ट्रीय आवाहन धुडकावले. गाझा पट्टीवर सत्ता गाजवणाऱ्या हमासच्या अतिरेक्यांना चिरडण्याचा इस्रायलचा लढा ‘पूर्ण ताकदीने’ सुरू राहील, असे ते म्हणाले. टीव्हीवरील एका भाषणात नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की, गाझामधील अतिरेक्यांनी ओलिस ठेवलेल्या २३९ लोकांना सोडले तरच युद्धबंदी शक्य आहे.

अमेरिकेच्या मतांशी विसंगत भूमिका

नेतन्याहू यांनी आपल्या भाषणात भर दिला की, युद्धानंतर गाझाचे निशस्त्रीकरण केले जाईल. इस्रायल भूभागावर आपले सुरक्षा नियंत्रण राखेल. ही भूमिका इस्रायलचा मित्र अमेरिकेने युद्धोत्तर परिस्थितींबाबत व्यक्त केलेल्या मतांशी विसंगत आहे. इस्रायलने हा परिसर ताब्यात घेण्यास विरोध असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. 

इस्रायली वसाहतींविराेधात ठरावास भारताचा पाठिंबानपॅलेस्टाईनमधील इस्रायलच्या वसाहतींचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या ठरावाच्या बाजूने भारताने मतदान केले आहे. पूर्व जेरुसलेमसह सीरियाच्या टेकड्यांधील पॅलेस्टिनाव्याप्त प्रदेशात वसाहती निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा निषेध करणारा ठराव गुरुवारी मंजूर करण्यात आला. याला विरोध करणाऱ्या सात देशांमध्ये अमेरिका आणि कॅनडा यांचा समावेश आहे. अठरा देश मतदानापासून दूर राहिले.

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध