शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नशिबाची खैरात! लॉटरीची लागोपाठ दोन बंपर बक्षिसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2017 00:26 IST

लॉटरीमध्ये बंपर बक्षिस जिंकण्याची शक्यता दीड कोटींमागे एक एवढी दुर्मिळ असे संख्याशास्त्र मानते

कॅलिफोर्निया: लॉटरीमध्ये बंपर बक्षिस जिंकण्याची शक्यता दीड कोटींमागे एक एवढी दुर्मिळ असे संख्याशास्त्र मानते. पण कॅलिपोर्नियातील रोझा डॉमिंग्युएज या १९ वर्षाच्या तरुणीचे नशीब एवढे बलवत्तर की कॅलिफोर्निया सरकारी लॉटरीच्या लागोपाठच्या दोन सोडतींची बंपर बक्षिसे तिला लागली आहेत. गेल्या आठवड्यात अ‍ॅरिझोनाहून घरी परतत असताना ‘आजचा दिवस लकी आहे’, असा विचार तिच्या मनात आला आणि पासो रोबल्स येथे पेट्रोल पंपावर थांबली असता तिने ‘पॉवर ५’ या लॉटरीच्या तिकिटाचे पाच डॉलरचे स्क्रॅचकार्ड खरेदी केले. लॉटरीच्या निकालाच्या दिवशी तिने ते कार्ड स्क्रॅच केले आणि तिकिटाच्या त्या क्रमांकाला ५,५५,५५५ डॉलरचे चक्क बंपर बक्षिस लागलेले होते!हा आनंद ओसरलेला नसतानाच काही दिवसांनी पुन्हा प्रवास करताना तिने पुन्हा एकदा नशीब आजमावून पाहायचे ठरविले. यावेळी तिने मॉन्टेरी कौंटीमधील पेट्रोल पंपावर ‘लकी फॉर्च्युन’ या लॉटरीचे तिकिट काढले आणि या तिकिटालाही एक लाख डॉलरचे पहिले बक्षिस लागले. अशा प्रकारे रोझाला एकाच आठवड्यात दोन लॉटरींमध्ये मिळून बक्षिसापोटी ६,५५,५५५ डॉलर मिळाले! नशिबाच्या या खैरातीने रोझा एवढी आनंदित झाली की तिला अश्रुंना आवर घालणे कठीण झाले! आनंदाच्या या धक्क्यातून ती सावरली नसून बक्षिसाच्या एवढ्या पैशाचे करायचे काय, हे तिने अद्याप ठरविलेले नाही. पण भरपूर शॉपिंग करायचे व एखादी फक्कडशी नवी मोटार घ्यायची, असा तिचा विचार आहे.