शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

'कधी होणार मूल?' लाखो नवविवाहित जोडप्यांना एकच प्रश्न; लोकसंख्येत घट झाल्याने चीन चिंतेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 12:42 IST

नवविवाहित महिलेने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. प्रशासनाच्या वतीने महिलेला एक फोन आला होता ज्यामध्ये ती कधी प्रेग्नेंट होणार असा प्रश्न तिला विचारण्यात आल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

जगभरात सर्वाधिक लोकसंख्या असलेला चीन आता वेगळ्याच कारणामुळे त्रस्त झाला आहे. लोकसंख्येत हळूहळू घट होत असल्याने चीनचं टेन्शन आता वाढलं आहे. एका नवविवाहित महिलेने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. प्रशासनाच्या वतीने महिलेला एक फोन आला होता ज्यामध्ये ती कधी प्रेग्नेंट होणार असा प्रश्न तिला विचारण्यात आल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

महिलेच्या या पोस्टवर जवळपास दहा हजार लोकांनी कमेंट केली आणि त्यांनाही अशाच प्रकारचा कॉल आल्याचं म्हटलं आहे. आणखी एका महिलेने देखील अशाच प्रकारच्या कॉलची माहिती दिली आहे. सरकारला असं वाटतं की नवविवाहित एका वर्षात प्रेग्नेंट झाले पाहिजेत असं फोनवर अधिकाऱ्याने महिलेला सांगितलं. यासाठी सातत्याने फोन करत असल्याचं देखील म्हटलं आहे. गेल्या ऑगस्टमध्ये एका महिलेचं लग्न झालं. पण तिला त्यानंतर दोनदा प्रेग्नेंट कधी होणार असा प्रश्न विचारण्यात आल्याचं तिने कमेंटमध्ये सांगितलं.

"तुमचं लग्न झालंय मग तुम्ही मुलांचं प्लॅनिंग का करत नाही?"

फोनवर अधिकारी तुमचं लग्न झालं आहे मग तुम्ही मुलांचं प्लॅनिंग का करत नाही? मुलांना जन्म देण्यासाठी वेळ काढा असं म्हणतात. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी गेल्या आठवड्यात कम्युनिस्ट पार्टीच्या बैठकीत देशाचा बर्थ रेट वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा केली आणि देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी रणनीतिमध्ये सुधारणा करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच हळूहळू लोकसंख्या घटत असल्याचं देखील चीनने आता स्वीकारलं आहे. 

वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2019 नुसार, सध्या चीन 1.44 अब्ज लोकसंख्येसह पहिल्या स्थानावर आहे तर भारत 1.39 अब्जासह दुसऱ्या स्थानावर आहे. जगभरातील एकूण लोकसंख्या ही चीनच्या 19 टक्के आणि भारताच्या 18 टक्के आहे. रिपोर्टनुसार, 2023 पर्यंत भारताची लोकसंख्या वाढून चीनपेक्षाही जास्त होईल. तसेच चीनची लोकसंख्या 2019 ते 2050 दरम्यान 3.14 कोटी म्हणजेच जवळपास 2.2 टक्क्यांनी कमी होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :chinaचीन