बीजिंग- पूर्व चीनमधल्या झेजियांग प्रांतात रविवारी एका कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तीन जण जखमी आहेत. निंगबो जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, निंगहाई काऊंटीतल्या स्थानिक वेळेनुसार दुपारी एक वाजताच्या सुमारास ही आग लागली. त्यानंतर ही आग मोठ्या प्रमाणात पसरत गेली.घटनास्थळी स्थानिक आपत्कालीन कर्मचारी आणि बचावकार्य राबवणारं पथक दाखल झालं असलं तरी त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश येतं होतं. रविवारी रात्री या आगीत 19 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ज्यात तीन जण जखमी आहेत, तर दोघांना गंभीर जखमा झाल्या आहेत.या कारखान्याला आग लागल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील प्रदूषणात वाढ तरी झाली नाही ना, याचंही स्थानिक पर्यावरण अधिकाऱ्यानं मूल्यांकन केलं आहे. कारखान्याला लागलेल्या आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहेत. स्थानिक पोलीस आणि अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
चीनमध्ये कारखान्याला भीषण आग, 19 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 08:45 IST