शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर श्रीलंकेने घातली बंदी; दोन धर्मीयांत तणाव, देशभर सहा तासांची संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 05:25 IST

फेसबुकवरील एका पोस्टमुळे मशिदींवर तसेच मुस्लिमांच्या मालकीच्या व्यवसायांवर हल्ले सुरू झाले आणि धार्मिक तणाव भडकल्यामुळे श्रीलंकेने समाजमाध्यमांवर सोमवारी बंदी घातली.

कोलंबो : फेसबुकवरील एका पोस्टमुळे मशिदींवर तसेच मुस्लिमांच्या मालकीच्या व्यवसायांवर हल्ले सुरू झाले आणि धार्मिक तणाव भडकल्यामुळे श्रीलंकेने समाजमाध्यमांवर सोमवारी बंदी घातली.श्रीलंकेत सतत हिंसाचार पसरत चालल्यामुळे सोमवारी अधिकाऱ्यांनी संपूर्ण देशभर सहा तासांची संचारबंदी लागू केली आहे. सोमवारी रात्री नऊ ते पहाटे चार वाजेपर्यंत ही संचारबंदी राहील, असे पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.ईस्टर संडेला झालेल्या हल्ल्यांनंतरची ही सगळ्यात मोठी सामाजिक अशांतता आहे. ईस्टर संडेच्या हल्ल्यांत २६० जण ठार तर ५०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. देशाच्या पश्चिम किनाºयावरील गाव चिलावमध्ये जमावाने मशिदीवर व मुस्लिमांच्या मालकीच्या काही दुकानांवर हल्ले केल्यानंतर श्रीलंकेच्या पोलिसांनी दुसºया दिवशी गावात संचारबंदी लागू केली व त्यानंतर समाजमाध्यमांवर बंदी घालण्यात आली. (वृत्तसंस्था)आणखी हसू नका...एका मुस्लिम दुकानदाराने फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती. फेसबुकवर पोस्ट टाकणाºयाचे नाव अब्दुल हमीद मोहम्मद हासमर (३८) असे असून, त्याने ‘आणखी हसू नका, एकेदिवशी तुम्ही रडाल’ असे त्या पोस्टमध्ये म्हटले होते.मुस्लिम दुकानदाराच्या या टिपणीला स्थानिक ख्रिश्चन्स आणखी हल्ले होणार आहेत, अशी धमकी समजले. अल्पसंख्य मुस्लिम आणि बहुसंख्य सिंहली समाजात हिंसक घटना सुरू होताच मध्यरात्रीपासून फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली.रविवारी सायंकाळी उशिरा कुलियापित्यामध्ये मशीद आणि मुस्लिमांची मालकी असलेल्या काही दुकानांवर हल्ले झाल्यानंतर अशांतता पसरली व अधिकाऱ्यांनी वायव्येकडील शहरात संचारबंदी लागू केली होती. कुलियापित्या आणि चिलावमधील संचारबंदी मागे घेण्यात आल्याचे पोलिसांचे प्रवक्ते रुवान गुणसेकरा यांनी सांगितले.

टॅग्स :Sri Lankaश्रीलंका