शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी फेसबुक कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:45 IST

आगामी काळात भारत, मॅक्सिको, पाकिस्तान, ब्राझिल, अमेरिकेसह जगातील इतर देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे पावित्र्य अबाधित राहिल यासाठी फेसबुक पूर्ण काळजी घेणार आहे, असे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी अमेरिकन काँग्रेससमोर दिलेल्या साक्षीत म्हटले आहे.

वॉशिंग्टन : आगामी काळात भारत, मॅक्सिको, पाकिस्तान, ब्राझिल, अमेरिकेसह जगातील इतर देशांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे पावित्र्य अबाधित राहिल यासाठी फेसबुक पूर्ण काळजी घेणार आहे, असे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी अमेरिकन काँग्रेससमोर दिलेल्या साक्षीत म्हटले आहे. यावेळी त्यांनी माफीनामाही सादर केला.लाखो लोकांची वैयक्तिक माहिती फेसबुकवरुन केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने चोरुन तिचा काही निवडणुकांच्या कामासाठी वापर केल्याची प्रकरणे उजेडात आल्याने खळबळ माजली. त्यासंदर्भात झुकरबर्ग यांची दोन दिवस साक्ष होईल. झुकरबर्ग यांनी माफीनाम्यात म्हटले की, फेसबुक वापरकर्त्यांच्या माहितीचे संरक्षण तसेच निवडणुकांमध्ये होणारा परकीय हस्तक्षेप या मुद्द्यांवर कंपनीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. या मुद्द्यांसंदर्भात यापुढे कोणालाही तक्रारीला वाव मिळणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. याआधीही झुकरबर्गनी फेसबुक वापरकर्त्यांची जाहीर माफी मागितली होती.आर्टिफिशियल इंटेलिजन्स टुलचा वापर सुरुफ्रान्स, जर्मनीमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी झालेल्या तीन निवडणुकांवेळी मात्र फेसबुक दक्ष राहिले होते. या निवडणुकांवर प्रभाव पाडू शकणारी काही हजार अकाऊंट त्यावेळी बंद केली होती. आता फेसबुकने नवीन आर्टि फिशियल इंटेलिजन्स टुलचा वापर सुरु केला असल्याचे झुकरबर्ग म्हणाले.>राहुल गांधींनीमाफी मागावीभारतीय निवडणुकीत केंब्रिज अ‍ॅनालिटिकाने ढवळाढवळ केल्याचे स्पष्ट झाल्याने आणि यापुढे असे होऊ न देण्याची फेसबूकने ग्वाही दिल्याने राहुल गांधी यांनीही देशाची माफ मागावी आणि समाजात फूट पाडण्याचे असे उद्योग पुन्हा न करण्याची हमी द्यावी.- रविशंकर प्रसाद,माहिती व तंत्रज्ञानमंत्री (टिष्ट्वटरवर)

टॅग्स :Mark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग