जलालाबाद : पूर्व अफगाणिस्तानातील जलालाबाद या शहरात एका प्रमुख राजकीय नेत्याच्या घरी आत्मघाती बॉम्बरने घडवून आणलेल्या स्फोटात किमान १३ जण ठार आणि अन्य १४ जण जखमी झाले.गेल्या बुधवारपासून जलालाबादेत झालेला हा दुसरा आत्मघातकी बॉम्बस्फोट आहे. गेल्या बुधवारी पाकिस्तानी वाणिज्य दूतावासाला लक्ष्य करून घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी ‘इसिस’ने स्वीकारली होती. स्थानिक नेते ओबेदुल्लाह शिनबारी यांच्या घरी आदिवासी नेत्यांची बैठक (जिरगा) सुरू असताना रविवारी हा ताजा हल्ला झाला. (वृत्तसंस्था)
जलालाबादेत स्फोट; १३ ठार, १४ जखमी
By admin | Updated: January 18, 2016 03:37 IST