शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये मोठा स्फोट, 10 जखमी; परिसरात एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 14:22 IST

Explosion reported in Beyoglu district in Istanbul : स्फोटानंतर लोकांनी परिसर रिकामा केला आहे. दरम्यान, स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये आज मोठा स्फोट झाला. या स्फोटात 10 जण जखमी झाले आहेत. स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इस्तंबूलच्या Beyoglu जिल्ह्यात हा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर लोकांनी परिसर रिकामा केला आहे. दरम्यान, स्फोट कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

विशेष म्हणजे इस्तंबूलमधील स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटाचा आवाज ऐकून लोक हादरले. स्फोटामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. याशिवाय, लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे.

दुसरीकडे, तुर्कीने उत्तर इराकमधील कुर्द लोकांविरोधात हवाई मोहीम सुरू केली आहे, अशी घोषणा तुर्कस्तानचे संरक्षण मंत्री हुलुसी अकर यांनी सोमवारी पहाटे केली आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटवर शेअर केलेल्या व्हिडिओ मेसेजेमध्ये हुलुसी अकर म्हणाले की, तुर्की विमाने आणि तोफखान्याने कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या ठिकाणांवर हल्ला करत आहेत. तत्पूर्वी कमांडो पथक हेलिकॉप्टरमधून आणि जमिनीवरून शेजारच्या देशात दाखल झाले. मोहिमेत ड्रोनचाही वापर करण्यात आला.

याचबरोबर, विमानांनी कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीचे तळ, बंकर, गुहा, बोगदे, दारुगोळा डेपो आणि मुख्यालयावर यशस्वीरित्या मारा केला. हा गट उत्तर इराकमध्ये तळ ठेवतो आणि तुर्कस्थानवरील हल्ल्यांसाठी या भागाचा वापर करतो, असे तुर्कस्तानचे संरक्षण मंत्री  हुलुसी अकर यांनी सांगितले. तसेच, तुर्कीने गेल्या अनेक दशकांमध्ये पीकेकेविरुद्ध अनेक सीमापार हवाई कारवाई केली आहे, असेही  हुलुसी अकर म्हणाले. 

टॅग्स :Blastस्फोट