शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अंटार्क्टिका बेटावर अनुभवता येते २४ तासांची रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 05:06 IST

‘पोलर नाइट’ अर्थात ध्रुवीय रात्र हा काळ अंटार्क्टिका बेटावरील अत्यंत संस्मरणीय आणि महत्त्वाचा कालावधी असतो.

- जयंत धुळप अलिबाग : ‘पोलर नाइट’ अर्थात ध्रुवीय रात्र हा काळ अंटार्क्टिका बेटावरील अत्यंत संस्मरणीय आणि महत्त्वाचा कालावधी असतो. या काळात रात्र २४ तासांपेक्षा जास्त काळाची असते. हे केवळ पोलर सर्कल अर्थात ध्रुवीय मंडळातच घडते. दक्षिणी क्षेत्रातील अंटार्क्टिकामधील ‘भारती’ भारतीय संशोधन केंद्र क्षेत्रात ही २४ तासांची रात्र अनुभवास येते आणि ही परिस्थिती सुमारे ४९ दिवस असते. सोमवार, १६ जुलै रोजी ४९ दिवसांची रात्र संपून सूर्योदय अनुभवला, असा अनुभव अंटार्क्टिका एक्स्पिडीशनमध्ये सहभागी असलेले, अलिबाग येथील जागतिक कीर्तीच्या भूचुंबकीय वेधशाळेतील संशोधक बागती सुदर्सन पात्रो यांनी सांगितला आहे.१६ जुलै रोजी ‘पोलर नाइट’ संपुष्टात आल्या असल्या, तरी अद्याप आकाश निरभ्र झाले नसल्याने नियमित सूर्यप्रकाश येथे नाही. सतत अंधार असलेल्या परिस्थितीत दैनंदिन कामकाज करणे आव्हानात्मक असते. अशा वेळी येथे कार्यरत टीमचे स्पिरीट (संघ भावना) महत्त्वाचे असते. मानवी ऊर्जा टिकवून ठेवणे आणि काम करण्यासाठी एक उच्च सकारात्मक आत्मविश्वास, अलिप्तपणाला बाजूला सारून, सकारात्मक मानसिकता टिकवून ठेवण्याकरिता टीम स्पिरीट उपयुक्त ठरते, असेही पात्रो यांनी सांगितले.अंधाऱ्या काळात अंटार्क्टिकावर अत्यंत सुंदर आणि विलोभनीय निसर्गचित्र अनुभवास येते. स्वच्छ वातावरणामुळे चंद्र अत्यंत उबदार आणि मोठा दिसतो. तारे प्रकाशमान दिसतात आणि सूर्याच्या अनुपस्थितीत तेच हृदयास ऊर्जा देतात, असा भावुक अनुभवही त्यांनी सांगितला. अंटार्टिका एक्स्पिडीशनमधील आमचे संशोधनकार्य अखेरच्या टप्प्यात आहे. येत्या डिसेंबरमध्ये अलिबागमध्ये परत येईन, असे पात्रो यांनी सांगितले.

टॅग्स :environmentवातावरणNightlifeनाईटलाईफ