शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा इस्राइली मित्र पराभवाच्या छायेत? एक्झिट पोलनी वर्तवला धक्कादायक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 13:19 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र म्हणून भारतात प्रसिद्ध झालेले इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सार्वत्रिक निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे.

 येरुशलेम - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र म्हणून भारतात प्रसिद्ध झालेले इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सार्वत्रिक निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. इस्राइलमधील सार्वत्रिक निवडणूक आटोपल्यानंतर प्रकाशित झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नेतान्याहू यांच्या पक्षाला बहुमत मिळणार नाही. त्यामुळे सर्वाधिक काळ इस्राइलचे पंतप्रधानपद भूषणवणाऱ्या नेतान्याहू यांचे पाचव्यांचा देशाचे पंतप्रधानपद भूषवण्याचे स्वप्न अपूर्णच राहण्याची शक्यता आहे. बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्राइलमधील निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. आपले यशस्वी परराष्ट्र धोरण आणि परदेशामधील इस्राइलची भक्कम प्रतिमा अधोरेखित करण्यासाठी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक डोनाल्ड ट्रम्प, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे भेटीचे फोटो प्रचारादरम्यान वापरले होते.  इस्राइलमध्ये सहा महिन्यांच्या काळात दुसऱ्यांदा होत असलेल्या या निवडणुकीकडे बेंजामिन नेतान्याहूयांच्याचासाठी जनादेश संग्रह म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, एक्झिट पोलचा कल पाहिला तर त्यानुसार देशात कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. या एक्झिट पोलनुसार 120 सदस्यीत इस्राइल संसदेत नेतान्याहू यांच्या लिकूड पक्षाला 55 ते 57 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर नेतान्याहू यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या बेनी गैँट यांचा पक्षसुद्धा बबहुमतापासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतमोजणीनंतर इस्राइलमध्ये आघाडी सरकार स्थापन होऊ शकते. इस्राईलमधिल निवडणुकीबाबत भारतातही उत्साह दिसून येत होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बनलेल्या अनौपचारिक सबंधांमुळे नेतान्याहू हे सत्तेत कायम राहावेत, अशी भारत सरकारची अपेक्।आ आहे. गेल्या काही वर्षांत भारत आणि इस्राइल यांचाचा संबंध गेल्या काही काळात मजबूत झालेले आहेत. 

टॅग्स :IndiaभारतIsraelइस्रायलElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू