शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

2011 साली नेतान्याहू इराणवर हल्ला करणार होते, मोसादच्या माजी प्रमुखाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 15:49 IST

तामिर पार्दो असे या माजीप्रमुखांचे नाव असून ते केशेट टीव्हीच्या उवादा या कार्यक्रमात त्यांनी नेतान्याहू यांच्या नावासह हा गौप्यस्फोट केला.

जेरुसलेम- इस्रायल आणि मध्यपुर्वेतील देशांच्या शत्रूत्वाला गेल्या 70 वर्षांचा इतिहास आहे. सौदी अरेबिया, सीरिया, लेबनॉन, इजिप्त, जॉर्डन यांच्याबरोबर इराण आणि इराक यांच्याशीही इस्रायलचे अनेकदा वाद किंवा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. अचानक लष्करी करावाई करणाऱ्या या चिमुकल्या देशाने 2011 साली इराणवरही हल्ला करण्याचे नियोजन केले होते असे मोसाद या इस्रायली गुप्तचर संस्थेच्या माजी प्रमुखाने सांगितले आहे. 2011 साली 15 दिवसांमध्ये इराणवर हल्ला करण्याची तयारी करा असे आदेश पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

(मोसादचे सध्याचे प्रमुख योसी कोहेन, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि मोसादचे माजी प्रमुख तामिर पार्दो)ऑपरेशन एन्टेबी या कारवाईमध्ये इस्रायलने आपले अपहृत नागरिक युगांडामधील एन्टेबी या विमानतळावरुन इदी अमिनच्या तावडीतून सोडवून आणले होते. तसेच इराकवर ऑपरेशन ऑपेरा या कारवाईद्वारे हल्ला करून इराकमध्ये आकारास येत असलेल्या अणूभट्ट्या उद्धवस्त केल्या होत्या. 1981 साली इस्रायलने केलेल्या या कारवाईमुळे सर्व जगाला आश्चर्याचा धक्का बसला होता. आताही अशाचप्रकारे इराणवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात इस्रायल होता असे मोसादच्या माजी प्रमुखांच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे.तामिर पार्दो असे या माजीप्रमुखांचे नाव असून ते केशेट टीव्हीच्या उवादा या कार्यक्रमात त्यांनी नेतान्याहू यांच्या नावासह हा गौप्यस्फोट केला. मात्र त्यानंतर काय झाले याबाबत कोणतेही स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले नाही.इस्रायलचे माजी संरक्षणमंत्री एहूद बराक यांनीही नेतान्याहू 2010 आणि 2011 साली इराणवर हल्ला करण्याच्या बेतात होते असा दावा केला होता मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा दावा लगेच फेटाळला होता. मात्र पार्दो यांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही.

टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायलprime ministerपंतप्रधानIranइराण