शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रशियाने अणुबॉम्ब टाकला तरी आम्ही टाकणार नाही; संभाव्य तिसऱ्या महायुद्धातून फ्रान्सची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 05:45 IST

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ३० सप्टेंबर रोजी युक्रेनच्या १८ टक्के भागाच्या विलीनीकरणाची औपचारिक घोषणा केल्यानंतर काही तासांनंतर, राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नाटोला सदस्यत्व त्वरित मिळावे यासाठी दावा दाखल केला आहे.

लंडन : युक्रेनला अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) लष्करी युतीमध्ये प्रवेश दिल्यास तिसरे महायुद्ध अटळ आहे, असा सज्जड इशारा रशियाने दिल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे नाटोने मात्र रशियाने अण्वस्त्रांच्या वापरापासून दूर राहावे, असे आवाहन केले आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ३० सप्टेंबर रोजी युक्रेनच्या १८ टक्के भागाच्या विलीनीकरणाची औपचारिक घोषणा केल्यानंतर काही तासांनंतर, राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नाटोला सदस्यत्व त्वरित मिळावे यासाठी दावा दाखल केला आहे. अशा पावलांमुळे तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल हे युक्रेनला चांगलेच माहीत आहे, असे रशियाचे म्हणणे आहे.असे रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपसचिव अलेक्झांडर वेनेडिक्टोव्ह यांनी म्हटल्याचे रशियन तास या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.  सुरक्षा परिषदेचे उपसचिव वेनेडिक्टोव्ह यांच्या मते युक्रेनचा नाटोच्या सदस्यत्वाचा अर्ज हा दिशाभूल करण्याचा प्रकार आहे, कारण पश्चिमेकडील देशांना नाटोच्या युक्रेनियन सदस्यत्वाचे परिणाम समजले आहेत.

पुतीन यांनी नाटोच्या पूर्वेकडील विस्तारासाठी, विशेषतः युक्रेन आणि जॉर्जिया यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांवर वारंवार टीका केली आहे. २१ सप्टेंबर रोजी पुतीन यांनी रशियाच्या संरक्षणासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा इशारा दिला होता. 

बेलारूसने ओढली रशियाची री...रशियाचा मित्र बेलारूसनेही रशियाने दिलेल्या महायुद्धाच्या धमकीची री ओढली आहे. जगभरात ठिकठिकाणी सैन्य तैनात केल्याने जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे, असा इशारा बेलारूसचे नेते अलेक्झांडर लुकाशेनको यांनी दिला आहे. 

महायुद्ध नको : फ्रान्सआम्ही युक्रेनला स्वत:च्या भूमीवर संरक्षणासाठी मदत करत आहोत; परंतु रशियावर हल्ला करण्यासाठी ही मदत  नाही. रशियाने तत्काळ युद्ध थांबवून युक्रेनच्या स्वायत्ततेचा सन्मान केला पाहिजे, आम्हाला तिसरे महायुद्ध नको आहे, अशी भूमिका फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मांडली आहे.

भारत अलिप्तरशियाने युक्रेनचा काही भाग जोडण्याच्या प्रयत्नांचा निषेध करणाऱ्या मसुद्याच्या ठरावावर भारताने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (यूएनजीए) अलिप्त राहणे पसंत केले. रशिया आणि युक्रेनने शत्रुत्व सोडून तत्काळ संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गावर परत येण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाFranceफ्रान्स