अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी झाल्यानंतरही स्ट्रेट ऑफ होर्मुझ पूर्णपणे खुला करण्यात इराण असमर्थ ठरला आहे. इराणनं समुद्रात पसरलेले भूसुरुंग त्यांनाच सापडत नाहीत, ते हटवण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाने लवकरात लवकर होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची मागणी इराण पूर्ण करू शकत नाही असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या महत्त्वाच्या सागरी जलमार्गावरून जास्तीत जास्त जहाजांची वाहतूक सुरू व्हावी असं अमेरिकेला वाटते.
होर्मुझ सामुद्रधुनी सुरू करण्यातील अडथळ्यांमुळे शांतता चर्चेतही अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या आठवड्यात पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे इराणी आणि अमेरिकन शिष्टमंडळात शांतता चर्चा पार पडणार आहे. हे दोन्ही देश युद्ध रोखण्यासाठी आणि कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु होर्मुझमधील वाहतूक या चर्चेतील मुख्य मुद्दा असल्याने अद्याप या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली नाही त्यामुळे चर्चेत बाधा येण्याची शक्यता आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी हा जगातील सर्वात महत्त्वाचा जलमार्ग आहे. जगातील जवळपास एकूण २० टक्के तेल व्यापार याच मार्गाने होतो. ही जलवाहतूक बंद झाल्यास किंवा कमी झाल्यास जागतिक तेलाच्या किमती गगनाला भिडतील. गेल्या महिन्यात अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने लहान बोटींचा वापर करून या सामुद्रधुनीत भूसुरुंग पेरले. इराणने ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांची धमकीही दिली. त्यामुळे या मार्गावरील तेलवाहू जहाजे आणि इतर जहाजांची वाहतूक जवळजवळ थांबली आणि जागतिक ऊर्जा संकट ओढावले.
अमेरिका इस्रायलविरोधात होर्मुझ सामुद्रधुनी इराणसाठी युद्धातील सर्वात महत्त्वाचे शस्त्र बनले. इराणने काही जहाजांना टोल देऊन अरुंद मार्ग खुला ठेवला होता, परंतु संपूर्ण सागरी मार्ग सुरक्षित नव्हता. या जलमार्गावर इराणने अंदाधुंद आणि अनियमितपणे सागरी सुरुंग पेरले. अनेक भूसुरुंगांची नोंद ठेवली गेली नाही. जिथे नोंदी ठेवल्या होत्या, तिथेही काही वाहून गेले किंवा जागा बदलली. आता किती भूसुरुंग आहेत याची इराणला काहीच कल्पना नाही असं अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे. या मार्गावरील जहाजे भूसुरुंगांवर आदळू शकतात असं इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) इशारा दिला आहे. त्यांनी काही सुरक्षित मार्गांचे नकाशेही प्रसिद्ध केले आहेत. परंतु हे मार्ग खूपच मर्यादित आहेत. सुरुंग पेरण्यापेक्षा ते काढून टाकणे हे खूपच अवघड काम आहे. अगदी अमेरिकन सैन्याकडेही भूसुरुंग वेगाने हटवण्याची क्षमता नाही. इराणकडे तर त्याहूनही कमी सुविधा आहेत.
Web Summary : Despite the ceasefire, the Strait of Hormuz remains unsafe as Iran struggles to clear mines, hindering peace talks. The US seeks its opening. Iran's actions have disrupted global oil trade, raising fears of energy crisis. Mine removal remains a challenge.
Web Summary : युद्धविराम के बावजूद, होर्मुज जलडमरूमध्य असुरक्षित है क्योंकि ईरान माइन हटाने के लिए संघर्ष कर रहा है, जिससे शांति वार्ता बाधित हो रही है। अमेरिका इसे खोलने का प्रयास कर रहा है। ईरान की हरकतों से वैश्विक तेल व्यापार बाधित हुआ है, जिससे ऊर्जा संकट का खतरा मंडरा रहा है। माइन हटाना एक चुनौती बनी हुई है।