शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

पॉपी रिमेम्ब्रन्ससाठी इंग्लंड सज्ज

By admin | Updated: November 8, 2015 01:54 IST

आॅक्टोबर महिन्याच्या अखेरचे दिवस आले की ब्रिटिश खासदार, नेते किंवा ब्रिटिश पंतप्रधानांच्या कोटावर एक लालभडक फूल आणि पान दिसू लागते. बीबीसीसारख्या

मुंबई : आॅक्टोबर महिन्याच्या अखेरचे दिवस आले की ब्रिटिश खासदार, नेते किंवा ब्रिटिश पंतप्रधानांच्या कोटावर एक लालभडक फूल आणि पान दिसू लागते. बीबीसीसारख्या वृत्तवाहिनीच्या निवेदकांच्या कपड्यांवरही हे फुल उगवते. हे फूल असते पॉपीचे म्हणजे आपल्या खसखस किंवा अफूचे. ११ नोव्हेंबर या दिवशी इंग्लंड आणि ब्रिटिश राष्ट्रकुल देशांमध्ये पहिल्या महायुद्धाच्या स्मरणार्थ स्मृतीदिन पाळला जातो. त्या निमित्ताने हे पॉपीचे फूल आणि पान कोटावर खोचले जाते. १९१८ सालच्या ११ व्या म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या ११ व्या दिवशी पहिले महायुद्ध संपले असे समजण्यात येते म्हणूनच या दिवसाला महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसून येते.११ नोव्हेंबर रोजी पहिल्या महायुद्धात आणि नंतरही ज्या जवानांनी रणभूमीवर बलिदान दिले त्यांच्या स्मृति जागविल्या जातात. स्मृतीस्थळावर पॉपीच्या फुलांचे चक्र अर्पण केले जाते तर पॉपीच्या फुलांचे इन्स्टॉलेशनही जागोजागी केले जाते. पॉपीच्या प्रतिकृती कोटावर लावण्यासाठी तसेच विविध आकारांच्या बनवून ११ नोव्हेंबरच्या बऱ्याच आधीपासून विक्रीस ठेवल्या जातात. या पॉपी रिमेम्ब्रन्सला अत्यंत महत्त्व आणि आदराचे स्थान उच्चपदस्थांसह सर्वच अधिकारी व सामान्य जनताही देत असते. खुद्द ब्रिटनची राणीही एका पॉपी इन्स्टॉलेशनला भेट देते आणि हुतात्म्यांच्या बलिदानाप्रती आदरांजली अर्पण करते. ब्रिटनचे आजी माजी पंतप्रधान, खासदार, विरोधी पक्षनेते सर्व मतभेद विसरून या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर दोन मिनिटे स्तब्धताही पाळली जाते. ११ नोव्हेंबर १९१९ रोजी तत्कालीन राजे पंचम जॉर्ज यांनी हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटे स्तब्धता पाळल्यानंतर ही प्रथा रूढ झालेली आहे. आता पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीला शंभर वर्षे पूर्ण होण्याची वेळ आली तरी यामध्ये कोणताही खंड पडलेला नाही.आता पॉपीची फुलेच श्रद्धांजलीसाठी का वापरली जातात, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्याचे कारण पॉपीचा रंग. लालभडक रंगाची ही फुले धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या रक्ताचे, त्यांच्या त्यागाचे प्रतीक मानले जातात. पॉपीचा या दिवसाशी संबंध जोडला जाण्याचे आणखी एक विशेष कारण आहे. ते म्हणजे ले. कर्नल जॉन मॅकक्राई या कॅनेडियन डॉक्टराची इन फ्लेंडर्स फिल्ड ही कविता. १९१५ साली पहिल्या महायुद्धाच्या फ्लेंडर्स फिल्ड या युद्धभूमीवर धारातीर्थी पडलेल्या जवानांना पाहून त्याने ही कविता लिहिली. आज ही फ्लेंडर्स भूमी फ्रान्स, बेल्जिअम आणि नेदरलँडसमध्ये विभागली गेली आहे. जेथे सैनिकांना वीरमरण आले त्या भूमीवर पॉपीची फुले चटकन उगवून आल्याचे त्याने निरीक्षण केले व त्याला शब्द सुचले, इन फ्लेंडर्स फिल्ड द पॉपीज ब्लो, बिटविन द क्रॉसेस, रो आॅन रोदॅट मार्क अवर प्लेस, अँड इन द स्कायद लार्क्स, स्टिल ब्रेव्हली सिंगिंग फ्लायत्याच्या कवितेमुळे पॉपीला अधिमान्यता जास्तच मिळू लागली. पॉपीबद्दल...युरोपात आढळणाऱ्या लालभडक पॉपी व ११ नोव्हेंबरचे समीकरण एकदम घट्ट आहे. पॉपीचे हे लालभडक, ओपियम पॉपी, हिमालयन ब्लू, व्हाईट पॉपी, असे अनेक प्रकार आढळतात.अनेक ठिकाणी अफू आणि खसखशीसाठी त्यांची शेती केली जाते. या फुलांवर नंतर बोंडांसारखी फळे येतात. त्याला चिरा पाडल्यावर येणारा स्राव गोळा केला जातो, त्यालाच अफू असे म्हणतात. तर या बोंडवजा फळात हजारो लहानशा बिया असतात, त्या आपल्या खसखशीच्या बिया होय. त्या बियांचा वापर अनारशासह अनेक पावाच्या प्रकारांवर घालून खाण्यासाठी केला जातो.