शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Corona : चिनी कंपन्यांनी 'या' देशाला लावला तब्बल दोन कोटी डॉलर्सचा चुना, गमतीशीर होता 'टेस्टिंग किट्सचा' सौदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 18:49 IST

जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्यासाठी इंग्लंडने दोन चिनी कंपन्यांकडून तब्बल 20 लाख टेस्टिंग किट विकत घेतल्या होत्या. मात्र या किट निकृष्ट असल्याने इंग्लंडमध्ये धूळ खात पडल्या आहेत.

ठळक मुद्देइंग्लंडने दोन चिनी कंपन्यांकडून तब्बल 20 लाख टेस्टिंग किट विकत घेतल्या होत्या20 लाख किट्ससाठी मोजले होते तब्बल 20 मिलियन डॉलर्सयातील अर्ध्याहून अधिक किट्स ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये धुळ खात पडून आहेत

लंडन : चीन जगभरात स्वस्त वस्तुंसाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा कमी पैशांत बऱ्यापैकी चिनी वस्तू विकत मिळतात. मात्र, अनेकदा, अशा स्वस्त वस्तूंच्या लोभामुळे ग्राहकांना चुनाही लागतो. असाच चुना आता इंग्लंडला लागला आहे. कोरोनाने इंग्लंमध्येही थैमान घालायला सुरुवात केली आहे. अशात जास्तीत जास्त टेस्ट करण्यासाठी त्यांनी दोन चिनी कंपन्यांकडून तब्बल 20 लाख टेस्टिंग किट विकत घेतल्या होत्या. मात्र या किट निकृष्ट असल्याने इंग्लंडमध्ये धूळ खात पडल्या आहेत.

असा झाला होता सौदा -न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या टेस्टिंग किट्सचा सौदाही गमतीशीर आहे. चीनमधील या दोन कंपन्यांनी 20 लाख किट्ससाठी 20 मिलियन डॉलर्सची मागणी केली होती. इंग्लंडमधील सरकारी अधिकाऱ्यांना हा सौदा थोडा महाग वाटला. यानंतर त्यांनी ही किंमत संबंधित कंपन्यांना कमी करायला सांगितली. मात्र यावर कंपन्यांनी किंमत कमी करण्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नाही, तर गरज असल्यास किट्स घ्या, अन्यथा सोडा, असे कंपन्यांनी म्हटले होते. इंग्लंडसाठीही हा सौदा मोडणे सोपे नव्हते. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही या किटची तारीफ केली होती. ते किट पाहताच म्हटले होते, की ही किट गेम चेंजर ठरू होऊ शकते. कारण ही किट प्रेग्नन्सी टेस्ट किट सारखीच आहे. याचा अर्थ कुणीही अवघ्या मिनिटात या किटच्या सहाय्याने आपली कोरोना टेस्ट करू शकतो. 

20 लाख किट्स निरुपयोगी -अखेर इंग्लंड आणि संबंधित दोन कंपन्यांचा सौदा पक्का झाला.  आणि दोन आठवड्यांतच इंग्लंडला 20 लाख किट्स मिळाल्या. मात्र, यातील अर्ध्याहून अधिक किट्स ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये धुळ खात पडून आहेत. या सर्व किट्स निरुपयोगी असल्याचे बोलले जात आहे. तसेच या किट्सच्या सहाय्याने तपासणी करण्याचाही काही फायदा नाही. मात्र, यासंदर्भात सरकारच्या वतीने कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, चीनमधून आलेल्या या किट्स निश्चितपणे कुचकामी असल्याचे संकेत मिळत आहेत.

टेस्टची संख्या वाढणार -इंग्लंडमध्ये सरकारने रोज 25 हजार कोरोना टेस्टचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र येथे सध्या 20 हजारपेक्षाही कमी टेस्ट होत आहेत. मात्र, आता या महिन्याच्या अखेरपासून रोज एक लाख टेस्ट केल्या जातील. तर पुढील महिन्यात त्या वाढवून अडीच लाख करण्यात येतील, असे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडchinaचीनLondonलंडन