America Iran News: इस्लामाबादकडे जगाचे लक्ष लागले आहे. पाकिस्तानातील याच शहरात अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध थांबवण्यासंदर्भातील चर्चा होत आहे. या चर्चेला सुरुवात होत असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या दिशेने प्रचंड संख्येने रिकामी तेल आणि गॅस जहाजे येत आहे, असे म्हटले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमुळे अनेक देशांच्या तेल-गॅस पुरवठ्यांवर परिणाम झाला आहे. त्यात आता ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ बंद राहिल्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, कारण अमेरिकेकडे प्रचंड आणि चांगले तेल असल्याचे संकेत दिले आहेत.
तेल-गॅस पुरवठ्याबद्दल ट्रम्प काय म्हणाले?
"जगातील सर्वात मोठी रिकामी तेलवाहू (गॅस) जहाजे प्रचंड संख्येने सध्या अमेरिकेकडे येत आहेत. ही जहाजे जगातील सर्वात उत्तम आणि उच्च गुणवत्तेचे तेल (आणि गॅस!) भरण्यासाठी येत आहेत. आपल्याकडे पुढील दोन सर्वात मोठ्या तेल अर्थव्यवस्थांच्या एकत्रित साठ्यापेक्षा जास्त तेल उपलब्ध आहे - आणि ते अधिक दर्जेदार आहे. आम्ही तुमची वाट पाहत आहोत आणि जलद सेवा आहे", असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
अमेरिका-इराणची शिष्टमंडळे पाकिस्तानात
दोन आठवड्यांची शस्त्रसंधी केल्यानंतर इराण-अमेरिका यांच्यात युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानात वाटाघाटी होणार आहेत. उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेचे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये आले आहेत.
दुसरीकडे इराणचे शिष्टमंडळही दाखल झाले असून, सध्या पाकिस्तानी अधिकारी दोन्ही शिष्टमंडळांशी चर्चा करत असल्याची माहिती मिळाली आहे. इराण, अमेरिका आणि पाकिस्तान या तिन्ही देशांनी एकत्र बैठक करावी असा प्रस्ताव ठेवला गेला आहे.
Web Summary : As US-Iran talks begin in Pakistan, Trump claims massive empty oil tankers are heading to America. He assures ample oil reserves, dismissing Hormuz Strait concerns. US delegation is in Islamabad for ceasefire negotiations.
Web Summary : पाकिस्तान में अमेरिका-ईरान वार्ता शुरू होते ही, ट्रंप ने कहा कि विशाल खाली तेल टैंकर अमेरिका जा रहे हैं। उन्होंने होर्मुज जलडमरूमध्य की चिंताओं को खारिज करते हुए पर्याप्त तेल भंडार का आश्वासन दिया। अमेरिकी प्रतिनिधिमंडल इस्लामाबाद में युद्धविराम वार्ता के लिए है।