शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:56 IST

अबू धाबी न्यायालयाने एका कंपनीला त्यांच्या कर्मचाऱ्याचा ५ महिन्यांचा पगार देण्याचे आदेश दिले आहेत. तो कर्मचारी एक दिवसही कामावर गेला नव्हता.

एका कर्मचाऱ्याला काम न करताच एका कंपनीने २६ लाख रुपये दिले. तर तुम्हाला ते पटेल का? पण, हे खरं आहे. अबू धाबी मधील कोर्टाने एक अजब निर्णय दिला. कोर्टाने एका कंपनीला आपल्या कर्मचाऱ्याला पाच महिन्यांचा पगार देण्याचे आदेश दिले. तो कर्मचारी एक दिवसही कामावर गेला नव्हता तरीही कोर्टाने हा निर्णय दिलाय.  कोर्टाच्या आदेशानुसार आता कंपनीला २६ लाख रुपये पगार कर्मचाऱ्याला द्यावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने त्या कर्मचाऱ्याला ऑफर लेटर दिले पण कधीही जॉईनिंगसाठी बोलावले नाही, असा आरोप कर्मचाऱ्याने केला आहे. कंपनीने कर्मचाऱ्यासोबत ५ महिन्यांचा करार केला होता. अशा परिस्थितीत आता कर्मचाऱ्याला ५ महिन्यांचा पगार दिला जाईल.

"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा

५ महिन्यांचा पगार द्यावा लागणार

कंपनीने जॉईन करुन घेतल्याबद्दल कर्मचाऱ्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती. 'कंपनीने त्याच्यासोबत ११ नोव्हेंबर २०२४ ते ७ एप्रिल २०२५ दरम्यान कामाचा करार केला होता, परंतु त्याला जॉईन करुन घेतले नाही', असा दावा कर्मचाऱ्याने केला.

कर्मचाऱ्याने कंपनीसोबत केलेल्या करारानुसार, कंपनीला ७,२०० दिरहम मूळ वेतन द्यावे लागेल. तसेच मासिक पेमेंट पॅकेज २४,००० दिरहम असेल. हे लक्षात घेऊन, न्यायालयाने कंपनीला कर्मचाऱ्याला २६ लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे की, पगार अहवाल, उत्पन्न करारासह सर्व कागदपत्रांवरून हे स्पष्ट होते की कंपनीकडून कर्मचाऱ्याच्या नियुक्तीत विलंब झाला आहे.

कंपनीने बाजू मांडली

कंपनीने कोर्टात आपली बाजू मांडली. या कंपनीकडून सांगितले की, कर्मचाऱ्याने सुरुवातीलाच रजा घेतली होती. त्यामुळे त्याला  कामावर बोलावण्यात आले नव्हते. कर्मचाऱ्याने ८ दिवसांची रजा घेतल्याचेही मान्य केले आहे. अशा परिस्थितीत, ८ दिवसांचा पगार कापून न्यायालयाने कंपनीला कर्मचाऱ्याला ४ महिने १८ दिवसांचा पगार देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम २६ लाख रुपये होते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलjobनोकरीCourtन्यायालय