शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Emmanuel Macron: विजयानंतर जनतेत गेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, लोकांनी फेकून मारले टमाटे, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 12:48 IST

Emmanuel Macron: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पुन्हा एकदा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी मरीन ले पेन यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.

Emmanuel Macron:फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पुन्हा एकदा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी मरीन ले पेन यांचा पराभव केला. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पॅरिसमध्ये प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी निवडणूक जिंकल्यानंतर मॅक्रॉन पहिल्यांदाच जनतेपर्यंत पोहोचले. पॅरिसच्या वायव्येकडील सेर्गी येथे ते मतदारांना भेटत होते, तेव्हा त्यांच्यावर टमाटे फेकण्यात आले. 

डेलीमेलच्या वृत्तानुसार, सुरक्षा कर्मचार्‍यांनी मॅक्रॉन यांना टोमॅटोपासून वाचवण्यासाठी लगेच छत्री उघडली आणि मॅक्रॉनचे डोकेही आपल्या हातांनी झाकले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मॅक्रॉन 'हे जास्त गंभीर प्रकरण नाही' असे म्हणताना ऐकू येत आहेत. या घटनेनंतर त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना तेथून दूर नेले. दुसर्‍या व्हिडिओमध्ये, एक आंदोलक एका टेबलवरून गर्दीवर उडी मारताना दिसतो, त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

रविवारी झालेल्या निवडणुकीत विजय मिळवून मॅक्रॉन पुन्हा एकदा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. मरीन ले पेन यांना सत्ता काबीज करण्यात अपयश आले. निवडणुकीत मॅक्रॉन यांना 58.5 टक्के तर मरीन ले पेन यांना 41.5 टक्के मते मिळाली आहेत. परंतू, मॅक्रॉन यांच्याबद्दल जनतेच्या मनात रोष आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीनंतरही देशात ठिकठिकाणी प्रदर्शने केलेली दिसत आहेत.

टॅग्स :Franceफ्रान्स