शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 14:20 IST

Elon Musk : अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आणि अरबपती इलॉन मस्क यांनी अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष सुरू करण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योजक आणि अरबपती इलॉन मस्क यांनी अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याची माहिती दिली. त्यांनी लिहिले की, "जर तुम्हाला नवीन राजकीय पक्ष हवा असेल, तर तो तुम्हाला मिळेल." आणि पुढे नमूद केले की "आज, अमेरिका पार्टी तुमचे स्वातंत्र्य परत मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आली आहे."

इलॉन मस्कने सुरू केली अमेरिका पार्टी!इलॉन मस्क यांनी त्यांच्या नवीन पक्षाचे नाव "अमेरिका पार्टी" असे ठेवले आहे. मस्क म्हणाले की, सध्या अमेरिका द्विपक्षीय (two-party system) व्यवस्थेत अडकली आहे, जिथे लोकशाही नसून भ्रष्टाचार आणि बिघाड वाढतो आहे. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र विचारसरणी असलेल्या लोकांसाठी नवीन पक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला.

यापूर्वी केलेले सर्वेक्षण४ जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन असताना मस्क यांनी एक्सवर एक सर्वेक्षण पोस्ट केले होते. त्यांनी लोकांना विचारले होते की, "आपण दोन पक्षीय प्रणालीपासून स्वतंत्र व्हावे का? आणि तुम्हाला नवीन अमेरिका पार्टी हवी का?" या सर्वेक्षणात ६५.४% लोकांनी "हो" असे उत्तर दिले, तर ३४.६% लोकांनी "नाही" असे मत दिले.

ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वादया घडामोडींमागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एक नवा कायदा कारणीभूत मानला जात आहे. ट्रम्प यांनी "One Big Beautiful Bill" नावाचा प्रस्ताव सादर केला आहे, ज्यामध्ये बेकायदेशीर स्थलांतरविरुद्ध मोठा निधी ठेवण्यात आला आहे. हा कायदा पुढील १० वर्षांत अमेरिकेचा आर्थिक तुटवडा ३.३ ट्रिलियन डॉलर्सने वाढवू शकतो, असा अंदाज आहे. या गोष्टींमुळे इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मतभेद झाले आणि मस्क यांनी 'DOGE' या पदाचा राजीनामा दिला.

मस्कचे नाव आणि प्रभावअमेरिकेत तिसऱ्या पक्षांना फारसा प्रभाव मिळत नाही, पण इलॉन मस्क यांचे नाव आणि लोकप्रियता लक्षात घेता त्यांचा पक्ष विशेष ठरू शकतो. टेक कंपन्यांमधील लोक आणि स्वतंत्र विचारसरणीचे मतदार मस्कच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका