शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचा डोकेबाजपणा! मेंदूत चीप बसवून माणसांवर राखणार नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 08:22 IST

निसर्ग नियमाविरुद्ध कृती असल्याची टीका, रिपेअर या प्रकल्पाचे काम व्हर्जिनियातील एका इमारतीमध्ये सुरू असून, त्यामध्ये २२० संशोधक कार्यरत आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकी सरकार आपल्या सैनिकांच्या मेंदूत इलेक्ट्रॉनिक चीप बसवून त्यांच्यावर नियंत्रण राखण्याची व त्यांचे शारीरिक सामर्थ्य वाढविण्यासाठी संशोधन करत आहे.

इलॉन मस्क यांच्या न्यूरालिंक ब्रेन ही कंपनी माणसाच्या मेंदूत इलेक्ट्रॉनिक चीप बसविण्यासाठी येत्या सहा महिन्यांत प्रयोग सुरू करण्याची शक्यता आहे. मात्र, असे प्रयोग निसर्ग नियमाच्या विरोधात असल्याची टीका होत असल्याने ते संशोधन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. माणसाच्या मेंदूत इलेक्ट्रॉनिक चीप बसवली तर त्याच्या अनेक आजारांना रोखता येईल, असे सांगण्यात येत आहे. 

या कारणांसाठी  संशोधनअमेरिकेचे हजारो सैनिक अफगाणिस्तान व इराकमध्ये युद्ध केल्यानंतर काही वर्षांनी मायदेशी परतले. नैराश्यामुळे त्यातील कित्येकांनी आत्महत्या केली आहे. युद्धग्रस्त वातावरणात व शांततेच्या काळात मेंदू वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतो. चीपद्वारे त्यांच्या भावनांवर नियंत्रण मिळविता येईल का, यादृष्टीने संशोधन सुरू आहे. 

२२०हून अधिक संशोधक कार्यरतरिपेअर या प्रकल्पाचे काम व्हर्जिनियातील एका इमारतीमध्ये सुरू असून, त्यामध्ये २२० संशोधक कार्यरत आहेत. अतिशय गोपनीय पद्धतीने चाललेल्या या संशोधनात आणखी २ हजार कर्मचारी सक्रिय आहेत. विविध विद्यापीठातील नामवंत संशोधक या प्रकल्पात मोठे योगदान देत आहेत. 

सैनिकांचे सामर्थ्यही वाढणारअमेरिकी सैनिकांच्या मेंदूत चीप बसविल्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण नियंत्रण राखता येणार आहे, त्यांचे शारीरिक सामर्थ्यदेखील वाढविण्याचा प्रयत्न अमेरिकेचे संशोधक करणार आहेत, असा दावा २०१५ साली दी पेटॅगॉन ब्रेन या पुस्तकात केला होता. 

‘रिपेअर’ असे संशोधन प्रकल्पाचे नावअमेरिकेच्या डिफेन्स ॲडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीने (डीएआरपीए) देखील मेंदूत चीप बसविण्यासंदर्भात काही संशोधन सुरू केले आहे. त्या प्रकल्पाला रिपेअर असे नाव दिले आले आहे.